वसई : विरार येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या सैन्यभरतीसाठी सोमवारपर्यंत सुमारे ३० हजार तरूणांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. भरतीच्या उद्घाटनाला वसई- विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर उपस्थित होते.याबाबत माहिती देण्याकरीता लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वसईत याचा उच्चांक झाला असून ३० हजार तरूणांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. इतका प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. अशी सैन्यभरती दरवर्षी केल्यास आम्ही त्यास सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन आ. क्षितीज ठाकूर यांनी आपल्या भाषणात दिले. या पत्रकार परिषदेनंतर सैन्यभरतीच्या कामास सुरूवात झाली. भरतीबद्दल अधिक माहिती देताना ब्रिगेडीयर बी. के. खजुरीया म्हणाले, काही महिन्यापासून आम्ही पनवेल, जव्हारला भरती केली तिला चांगला प्रतिसाद लाभला आता वसई या भागात सैन्यभरती करीत आहोत. तिलाही उत्तम प्रतिसाद आहे.(प्रतिनिधी)
सैन्यभरतीला प्रचंड प्रतिसाद
By admin | Updated: September 1, 2015 23:54 IST