शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तलासरीतील ग्रा.पं.वर मार्क्सवादी कम्युनिस्टांचे वर्चस्व

By admin | Updated: April 19, 2016 01:48 IST

या तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली

सुरेश काटे,  तलासरीया तालुक्यात सत्ता परिवर्तना नंतर भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज होता परंतु मा.क.पा च्या कार्यकर्त्यांनी आपली ताकदपणाला लावून १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित केली तर भाजपाने केवळ झरी ग्रामपंचायतीवर बहुमत मिळाले तर संभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपा अपक्षाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित करू शकेल.तलासरी तालुक्यातील १) तलासरी २) वसा ३) वडवली ४) कोचाई झ्र बोरमाळ ५) वरवाडा ६) सावरोली-अनवीर ७) डोंगारी ८) आमगाव अच्छाड या आठ ग्रामपंचायतीवर माकपने निर्विवाद बहुमत मिळविले या पैकी वरवाडा, सावरोली-अनवीर, डोंगारी, आमगाव-आच्छाड या चार ग्रामपंचायतीमध्ये मा.क.पा. ने कोणालाही शिरकाव करू दिलानाही. पण तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायतीमध्ये माकपला खातेही उघडता आले नाही.भारतीय जनता पक्षाला झरी या एकाच ग्रामपंचायतीवर बहुमत मिळवता आले तर संभा ग्रामपंचायतीमध्ये सहा जागा मिळाल्याने अपक्षाच्या मदतीने भाजपा सत्ता मिळवू शकते. भाजपाचे आमदार पास्कल धनारे हे तलासरीचे असल्याने भाजपाने ही ग्रामपंचायत प्रतिष्ठेची केली होती पण त्याला म्हणावे तितके यश मिळविता आले नाही.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून वेगळा झालेला माजी आमदार राजाराम ओझरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बऱ्याच पैकी यश मिळवेल असे जनतेला वाटत होते पण तलासरी ग्रामपंचायतीत ३ जागा व वडवली ग्रामपंचायतीत २ जागा अशा ५ जागा सोडता तालुक्यात कोठेही यश मिळविता आले नाही.परंतु कोणत्याही खिजगणतीत नसलेल्या शिवसेना मनसे यांनी तीन तीन जागा जिंकून आपले अस्तित्व दाखविले बहुजन विकास आघाडीने झाई- बोरीवाग ग्रामपंचायातीमध्ये आठ जागा जिंकल्या पण सत्ता स्थापनेसाठी तिला अपक्षांची मदत घ्यावी लागणार. तालुक्यातील १२ पैकी ८ ग्रामपंचायतीवर मा.क.पा सत्ता प्रस्थापित करेल, भाजप अपक्षांच्या मदतीने दोन ग्रामपंचायतीवर ताबा मिळवेल तर सूत्रकार ग्रामपंचायातीमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तेसाठी सर्वांना तारेवरची कसरत करावी लागणार झाई - बोरीवाग ग्रामपंचायातीमध्ये भाजपा व बहुजन विकास आघाडीला बहुमत नसल्याने अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, कारण अपक्षांनी सत्तेची दोरी आपल्या हाती ठेवली आहे.तलासरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार मतदान होऊन सोमवारी तलासरी कार्यालयात मत मोजणी करण्यात आली यावेळी तलासरी तहसील कार्यालया बाहेर भाजपा, मा.क.पा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.