शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खाडीकिनारा विकासाला ‘मेरीटाइम’ची मंजुरी, जलवाहतुकीला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:33 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना लागून असलेल्या विस्तीर्ण खाडीकिना-याचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना लागून असलेल्या विस्तीर्ण खाडीकिना-याचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी मेरीटाइम बोर्डाने दिली आहे.बंदरे विकास राज्यमंत्री व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी मुंबई मंत्रालयात मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांची एक बैठक घेतली. याप्रसंगी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे महापालिकेतील कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा व नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे उपस्थित होते. चव्हाण यांनी मेरीटाइम बोर्डाला कल्याण-डोंबिवली शहराचा खाडीकिनारा विकसित करण्यासाठी ना- हरकत दाखला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यास मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाºयांनी अनुमती दर्शवली आहे. त्यामुळे खाडीकिनारा विकासासाठी सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे आदेश चव्हाण यांनी महापालिका अधिकाºयांना दिले आहेत. खाडीकिनारा विकासात डोंबिवली येथील मोठागाव येथे जेटी व संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास गती देण्यासाठी राज्य सरकार वेगाने निर्णय घेत आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीतून २८ प्रकल्पांसाठी दोन हजार ३०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत स्टेशन परिसर विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाला सगळ््यात आधी प्राधान्य दिले जाणार आहे.कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मध्य रेल्वेने अनुमती दर्शविली आहे. रेल्वे आणि महापालिका प्रत्येकी ५० टक्के निधी खर्च करणार आहेत. रेल्वे व महापालिकेचा सामंजस्य करार आठ महिन्यांपूर्वी झाला आहे.स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने यंदाच्या वर्षात दीडशे कोटींची तरतूद चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात केली आहे. केंद्राकडून ९० कोटी व राज्याकडून ४५ कोटींचा हिस्सा महापालिकेस मिळाला आहे. या निधीतून खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट केली जाणार आहे. खाडीकिनारा विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कल्याणच्या गणेश घाट आणि डोंबिवलीतील खाडीकिनाºयांवरील बेकायदा रेती उपसा करणाºयांवर मोठी कारवाई केली होती.वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटनंतर कल्याण ते ठाणे हा जलवाहतुकीच्या प्रवासाचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. ठाणे महापालिकेने त्याचा डीपीआर तयार केला आहे. त्यात ठाणे-कल्याण, ठाणे-नवी मुंबई, ठाणे-मुंबई, ठाणे-वसई अशी जलवाहतूक प्रस्तावित आहे. मेरीटाइम बोर्डाच्या ना-हरकतीमुळे जलवाहतुकीसाठी खाडीकिनारा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कल्याणचे नवीन जंक्शनठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोने जोडले जाणार आहे. या रेल्वेचे दुर्गाडी एक हे स्थानक आहे. कल्याण-भिवंडी खाडीपुलावर नव्याने समांतर सहा पदरी पूल तयार करण्याचे कामही सुरू आहे.दुर्गाडी ते गंधारे या रिंग रोडच्या पॅचच्या कामाची निविदाही एमएमआरडीएने काढली आहे. वॉटर फ्रंट डेव्हलमेंट या सगळ््यामुळे दुर्गाडी व खाडीकिनारा हे कल्याणचे आणखी एक जंक्शन ठरणार आहे. या शिवाय कल्याण-शीळ मार्गावर कोन ते कल्याण हा एलिव्हेटेड मार्गही प्रस्तावित आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका