शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

वडवली रेल्वेपुलासाठी ३१ मार्चची डेडलाइन; दहा वर्षे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:14 AM

आयुक्त भडकले कंत्राटदारावर; टिटवाळा रुग्णालयाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावा

कल्याण : शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. हे पाहून आमदार, महापौर आवाक्झाले. पुलाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा असे आदेश केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहे. यावेळी आयुक्त कंत्राटदारावर चांगलेच भडकल्याने आयुक्तांचे रुद्र रूप कंत्राटदाराला पाहायला मिळाले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर आता तरी या पुलाचे काम ३१ मार्चअखेर पूर्ण होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

कल्याणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा पाहणी दौऱ्याचे आयोजन कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी बोडके, महापौर विनीता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, नगरसेविका नमिता पाटील, नगरसेवक प्रकाश पेणकर, संतोष तरे उपस्थित होते.

कंत्राटदाराला तेथे विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की, जागेच्या वादातून वारंवार कामात अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे पुलाच्या बांधणीस विलंब होत आहे. आयुक्तांनी कंत्राटदाराला ताकीद दिली की, आता हयगय नको. पुलाचे काम ३१ मार्चपूर्वी झाले पाहिजे. या दौºयादरम्यान काळू नदीवरील पूल, टिटवाळा रुग्णालयाचे काम, रस्ते विकास, कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालातील आरोग्य सेवा, कल्याण स्कायवॉकची पाहणी करण्यात आली. कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत, अशी मागणी भोईर यांनी केली.

भोईर म्हणाले, टिटवाळा येथील काळू नदीवरील बंधाºयास गळती लागली आहे. त्यामुळे तो नव्याने बांधण्यात यावा, अशी सूचना आयुक्तांकडे केली आहे. टिटवाळा येथील रुग्णालयाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावले गेले पाहिजे. सध्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात मंजूर वैद्यकीय पदांनुसार निम्मी पदे रिक्त आहेत. ती महापोर्टल पद्धतीमुळे भरली जात नाहीत. त्यामुळे टिटवाळा येथील रुग्णालय महापालिकेने चालवायचे की ते सेवाभावी आरोग्य संस्थेला चालवण्यास द्यावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.रुक्मिणीबाई रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन, रेडिओलॉजी विभाग सुरू करावा. शास्त्रीनगर रुग्णालयात ‘क्रेष्णा डायग्नोस्टिक’द्वारे केंद्रीय आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे. त्याच धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय, रेडीओलॉजीची सेवा सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी आमदारांनी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातही सेवा १० फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना सांगितले.स्कायवॉकचीही केली पाहणीआमदारांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकची पाहणी केली. स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल आडिटचा अंतिम अहवाल आल्यावर त्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका