शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळा ऑनलाइन नाट्यप्रयोग जर्मनीतही ‘हिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:26 IST

नाट्यप्रेमी युवकांचा आगळावेगळा प्रयत्न

स्नेहा पावसकर ठाणे : लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक गोष्टी ऑनलाइन केल्या. शाळेचे वर्ग, ऑफिसचे काम ते घरात लागणाऱ्या वस्तूच्या ऑर्डरपर्यंत सगळंच. अगदी नाटक, गाण्यांचे शोसुद्धा. या लॉकडाऊनमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या नाट्यप्रेमी युवकांनी तयार केलेल्या ‘बिफोर द लाईन’ या मराठमोळ्या नाटयाचे ऑनलाईन प्रयोग झाले ते भारताबरोबरच अगदी थेट जर्मनीतही. त्याला तेथेही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. 

जवळपास संपूर्ण जगभर लॉकडाऊन असताना त्या काळातही मराठी नाट्याने परदेशातील लोकांचे मनोरंजन करत आपले वेगळे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर हीच नाट्यप्रेमी युवकांची टीम पुन्हा लॉकडाऊन झाले किंवा नाही तरीही पुन्हा आपला येणारा नवीन दीर्घांक जर्मनीसह इतरही काही देशांत ऑनलाइन सादर करण्याच्या विचारात आहे.

लॉकडाऊनमध्ये नाट्यगृह बंद होते, पण नाटक थांबून चालणार नाही. आपण नाटक घेऊन रसिकांपर्यंत पोहोचावे हे लक्षात घेत स्टोरिया प्रोडक्शन यांनी ऑनलाइन नाट्यप्रयोग करण्याचा विचार केला. तेव्हाची परिस्थिती आणि प्राप्त साधनांच्या साहायाने त्यांनी नाटक बसवले आणि त्याचे ऑनलाइन प्रयोग केले. भारताबरोबरीनेच जर्मनीतही याचे प्रयोग सादर करण्याचे ठरवून तिथे ‘मराठी अस्मिता जर्मनी’ या संस्थेच्या माध्यमातून ते सादरसुद्धा झाले. 

मात्र पहिल्या ऑनलाइन प्रयोगात काही तांत्रिक अडचणी आल्याने तेथील रसिकांना तो प्रयोग नीट पाहता आला नाही. त्यामुळे या टीमने प्रयोगाचे नाममात्र असलेले शुल्कही सगळ्यांना परत करून दुसऱ्या दिवशी ‘बिफोर द लाईन’चा मोफत प्रयोग दाखवला आणि त्याला तेथील प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. नितीन सावळे, नचिकेत दांडेकर, यश नवले, राजेश शिंदे या टीमने यासाठी भरपूर मेहनत घेतली.

आता पुन्हा नाट्यगृहे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने नाटयप्रयोग नाट्यगृहातच करण्यावर भर असेल. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढून लॉकडाऊन झाले किंवा नाही, तरी आम्ही आमच्या नवीन प्रसाद दाणी लिखित आणि संकेत पाटील, राजरत्न भोजने दिग्दर्शित एका मराठी दीर्घांकाच्या तालमीची मराठी राजभाषा दिनाच्या दिवशीच सुरूवात करीत आहोत, त्याचाही ऑनलाईन प्रयोग जर्मनी आणि इतरही काही देशात करणार असल्याचे या टीमने सांगितले.

टॅग्स :thaneठाणे