शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भाषा भवनाविरोधात ‘मराठी एकीकरण’ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 10:48 IST

समाजात तेढ निर्माण करणारे भवन होऊ न देण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवरून मीरा भाईंदर महापालिकेने मीरा रोडच्या हाटकेश भागात सुविधा भूखंडावर हिंदी भाषा भवनचे भूमिपूजन रविवारी आयोजित केले असून त्याला मराठी एकीकरण समितीने विरोध करीत आंदोलन केले. मराठी राजभाषा असून ‘मराठी भाषा भवन’ हवे असताना हिंदी भाषिकांच्या मतांसाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे भवन महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.  ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये विकासकांकडून उपलब्ध होणाऱ्या नागरी सुविधा भूखंड तसेच शासकीय जमिनीवर विविध भाषिक तसेच समाजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या इमारतींचे भूमिपूजन सुरू केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन, वारकरी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन यांची भूमिपूजने अलीकडेच करण्यात आली. रविवार २७ नोव्हेंबर रोजी हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवनाचे भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनसाठी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री स्वतंत्र देव सिंह, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, अभिनेते जितेंद्र कपूर आदींसह उत्तर भारतीय समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी हिंदी भाषिक कार्यक्रमांचे आयोजन भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. 

हिंदी भाषा भवनच्या अंतर्गत सजावटीसाठी राज्य सरकारकडून एक कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.  भवनाची इमारत ‘कन्स्ट्रक्शन टीडीआर’च्या माध्यमातून उभी राहणार आहे. हिंदी भाषिकांची शहरात मोठी संख्या असल्याने हे भवन उभे राहत आहे. येथे हिंदी साहित्यविषयक कार्यक्रम होतील. हिंदी पुस्तके, कवी संमेलने, परिसंवाद, व्याख्यानमाला, नाटके असे कार्यक्रम होऊ शकतात. चांगल्या कामात कोणीही विनाकारण प्रसिद्धीसाठी राजकारण करू नये, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.दरम्यान, हिंदी भाषा भवनला मराठी एकीकरण समितीने विरोध केला आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत यांनी भवनावर टीका केली. समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले. पालिका आणि पोलिसांनी तेथून त्यांना हटवले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकmarathiमराठी