शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घाणेकर नाट्यगृहाच्या लिफ्टमध्ये अडकला मराठी दिग्दर्शक विजू माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 16:48 IST

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे  - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे व्हीआयपी लिफ्टमधून जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडल्याची घटना घडली. सुदैवाने 15 मिनिटांच्या कालावधीनंतर त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांनी या प्रकाराचा संताप थेट फेसबुक शेअर केल्याने घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.सोमवारी सकाळी घाणेकर नाट्यगृहात आनंद विश्व गुरुकुल शाळेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विजू माने यांना सुद्धा आमंत्रण होते. दरम्यान ते सकाळी 10 वाजता या ठिकाणी पोहोचले असता, सुरक्षारक्षकाने त्यांना व्हीआयपी लिफ्टमधून नेण्यास सुरुवात केली. मात्र लिफ्ट पहिल्या आणि दुस-या मजल्याच्या मध्ये असतानाच अचानक बंद पडली. मध्येच लिफ्ट गचके घेऊ लागली. अखेर आरडाओरड सुरू झाल्यानंतर इतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी अक्षरश: बाहेर खेचून काढल्याचे माने यांनी सांगितले.जवळ जवळ 15 मिनिटे त्या लिफ्टमध्ये अडकून पडल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार थेट फेसबुकवर शेअर केला, यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला. उद्याचं माहिती नाही, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकला टाकली आहे. एकूणच पुन्हा एकदा घाणेकर नाट्यगृहाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले असून, प्रशासन आता याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमाला माने उपस्थित होते, त्याच कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के देखील हजर होते. त्यामुळे घडला प्रकार त्यांनी म्हस्के यांच्या कानावर घातला आहे.