शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जन्म महाराष्ट्रात झाल्याने मराठी येते, पंचम कलानी यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:30 IST

मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या.

उल्हासनगर : मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या. एकूणच त्यांनी मराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.उल्हासनगर महापालिका महासभेत पाणीप्रश्नावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी भाजपाच्या एका नगरसेवकाने पाण्याची समस्या मांडल्यानंतर पुन्हा सिंधी व हिंदी भाषेतून महापौरांना सांगितले. पाणीप्रश्नावर महापौर अथवा आयुक्तांनी प्रतिक्रिया न दिल्याने पुन्हा नगरसेवकांनी मराठीतून पाण्याची समस्या मांडली. त्यावेळी मला मराठी येत नाही, सिंधी भाषेत बोला, असे महापौर कलानी यांनी सभागृहात सांगितले. महापौरांना मराठी येत नाही, या वाक्यावर कोणत्याही मराठी नगरसेवकाने व मराठी प्रेम जपणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रतिक्रिया दिली नाही. दुसºया दिवशी मनसेने महापौरांच्या मला मराठी येत नाही, या वाक्याचा निषेध करून महापौरांना मराठी येत नसेल, तर महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका घेत मराठीचे बाराखडी पुस्तक देण्याचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली.मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी भाषेवर शिवसेना तोंडघशी पडली असून शहरात मराठी व सिंधी भाषेचा वाद निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सोशल मीडियावर महापौरांना मराठी येत नसेल, तर महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली. शहरातील वातावरण बघून महापौर कलानी यांनी शुक्रवारी आपल्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. माझा जन्म महाराष्ट्रात झाला असून मला मराठी येते, असे सांगून पुढील महासभेत मराठी भाषेत बोलणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपाचे नगरसेवक व माझ्यात गमतीचे बोलणे सुरू होते. त्या बोलण्याचा काही जणांनी विपर्यास केला. महापौर कलानी यांनी मराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.महापौरांनी माफी मागावीमहासभेत महापौर पंचम कलानी यांनी मला मराठी येत नाही, असे म्हटले होते. पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांना महासभेत जबाबदारीने बोलावे लागते. मला मराठी येत नाही, असे महापौरांनी गमतीने म्हटले असले, तरी मराठी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. महापौरांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर