शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाचा बेमुदत साखळी उपोषणाचा एल्गार 

By धीरज परब | Updated: November 1, 2023 19:50 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाने बुधवार १ नोव्हेम्बर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे .

मीरारोड - मराठा आरक्षणची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाने बुधवार १ नोव्हेम्बर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेते - पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत मराठा समाजास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मीरा भाईंदर सकल मराठा समाजाच्या वतीने भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट सर्कल ) येथे बुधवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे . रोज ७ मराठा समाज बांधव साखळी उपोषण करणार आहेत . आज साखळी उपोषणाच्या पहिल्या माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम , जयलक्ष्मी सावंत, लक्ष्मण पाटील, सुभाष काशीद, सचिन पोपळे, अंकुश मालुसरे , मनोज राणे व संतोष गोळे हे उपोषणास बसले होते.

या आंदोलनास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक , माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन , भाजपचे नरेंद्र मेहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी किमान वेतन महामंडळ अध्यक्ष आसिफ शेख , माजी नगरसेवक दिनेश नलावडे, अनिल सावंत , प्रमोद सामंत , अनिल भोसले , शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटक स्नेहल सावंत तसेच मराठा संघाचे सुरेश दळवी , रमेश पवार , देविदास सावंत , राजाराम सावंत आदींसह अनेक मराठा समाज बांधव उपोषण स्थळी जमले होते.

मुस्लिम समाजाचे अजीम तांबोळी सह अनेक मुस्लिम संस्था - संघटनांच्या  प्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होऊन मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्य उपोषणास पाठिंबा दर्शवला . आ . सरनाईक यांनी , आपण समाजाच्या सोबतच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासन हे लवकरच यावर तोडगा काढेल व जास्तकाळ आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास  व्यक्त केला.

मराठा आरक्षण आता घेतल्या शिवाय राहणार नाही . आमचे आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने सुरु असताना  सरकार मधील भाजपा पक्षाच्या नेत्यां कडून मराठा समाजासाठी जीवाची पर्वा न करता लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्ये करत मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला.

आम्हाला पक्ष वा कोणा नेत्याचा विरोध नसून राजकारण सुद्धा करायचे नाही . मात्र आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आंदोलनात व मराठा समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत असा इशारा यावेळी मराठा आंदोलकांनी दिला  . 

टॅग्स :mira roadमीरा रोडMaratha Reservationमराठा आरक्षण