शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:09 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर दाखल झालेले ३०७ आणि ३५३ या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा सोमवारी पुन्हा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचीही मागणी आश्वासन देऊनही अधिकाऱ्यांची चालढकलमराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिली माहिती

ठाणे : मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात दिला.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे काढून दोन ठोक मोर्चे काढले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे) या कलमांसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तरीही, मंत्रालयीन अधिकाºयांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. अशा सामान्य विभागाच्या अधिकाºयांवर निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना तसेच आरक्षणाचा मराठा समाजाला कुठेही फायदा झालेला नाही. उलट, २०१४ पासून या समाजातील युवक हा शिक्षण आणि नोकरीतून हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारसोबत आतापर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यातूनच मराठा तरुणांवर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थी आणि शेतकºयांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश असूनही शासन निर्णय घेत नाही. यातूनच सरकार आणि शासन मिळून समाजाची दिशाभूल करीत आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. २०१४ पासून २०१९ पर्यंतच्या मराठा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सारथी प्रशिक्षण संस्था मराठा समाजासाठीच सीमित करावी. ७२ हजार मेगाभरतीतील विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तातडीने अनुदानासहित कर्ज द्यावे. अन्यथा, हे महामंडळ बंद करावे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. पीकविमा तातडीने शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावा, आदी मागण्यांसाठी २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. समन्वयक आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनात अडवल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सुनील नागणे, राजेंद्र निकम, सूर्यकांत पोळ, तेजेंद्र पोटे, दीपक म्हापदी, तानाजी नांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा