शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:04 IST

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ती पोलिसांनी फेटाळली. नंतर सर्र्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.मनसैनिकांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रविवारी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, सकाळी ८.३० वाजता मनसैनिक रेल्वेप्रवासासाठी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्याआधीच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी हे आंदोलन करू नये, असे त्यांना बजावले.परंतु, जाधव यांनी पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती पोलिसांना केली. त्यांनी ती विनंती नाकारून जाधव यांच्यासह रवींद्र मोरे, महेश कदम, आशीष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सुटका केली.‘सरकार पडण्याच्या भीतीनेच लोक वेठीस’पोलिसांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. बससेवा सुरू आहे तिथेही गर्दी असते, तिथे कोरोना पसरणार नाही का? रेल्वे सुरू झाल्यावरच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार का? सरकार घाबरले आहे. सरकारला पडण्याची भीती वाटत असल्यामुळे ते लोकांना वेठीस धरत असल्याचे जाधव पुढे म्हणाले.भार्इंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखलमीरा रोड : लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी भार्इंदर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्यासाठी मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले गेले. परंतु सोमवारी मीरा भार्इंदरमधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भार्इंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना स्थानकात प्रवेशच करू दिला नाही. मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.बंदोबस्त झुगारून यांनी केला प्रवासजाधव आणि इतर मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली, तरी दुसरीकडे ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण यांनी तिकीट काढून ठाणे ते मुलुंड असा प्रवास करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश हितापे, जनार्दन खरिवले, हमराज जोशी हे तीन कार्यकर्ते होते. आम्ही तिकीट काढून प्रवास केला. आम्हाला कोणी अडविले नाही. रेल्वेमध्ये गेल्यावर डबा भरलेला होता. कोणतेही सुरक्षित अंतर पाळले गेले नव्हते. रेल्वे ही चाकरमान्यांची गरज आहे, हे दिसून आले. आत असलेल्या सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे