शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

२७ गावांची ‘मानपाडेश्वर नगर परिषद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:36 IST

इतकेच काय तर ‘कल्याण उपनगर परिषद’ या नावालाही विरोध दर्शवला आहे. संघर्ष समिती मानपाडेश्वर नगर परिषद या नावासाठी आग्रही असल्याचे समजते.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी असताना राज्य सरकारने केवळ १८ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील अधिसूचनाही बुधवारी काढली असून, हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. सरकारने ही प्रक्रिया सुरू केली असली, तरी संघर्ष समितीला अन्य नऊ गावे महापालिकेत ठेवून १८ गावे वगळण्याचा निर्णय मान्य नाही. सर्वच्या सर्व २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका त्यांना हवी आहे. इतकेच काय तर ‘कल्याण उपनगर परिषद’ या नावालाही विरोध दर्शवला आहे. संघर्ष समिती मानपाडेश्वर नगर परिषद या नावासाठी आग्रही असल्याचे समजते.कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, ‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मूळ मागणी होती. सरकारने उत्पन्न देणारी नऊ गावे महापालिकेत ठेवत उर्वरित १८ गावे वगळली आहेत. त्याला आमची हरकत असून, ही बाब सरकारकडे मांडणार आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी संघर्ष समिती लढा देत आहे. शिवसेना वगळून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांना २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाआघाडीचे सरकार सत्तेत आहे. शिवसेना हा सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांनी समितीच्या मागणीला वळण देत केवळ १८ गावेच वगळण्याचे कारस्थान केले आहे. समितीच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे.’समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले की, ‘सरकारने उत्पन्न देणारी गावे महापालिकेत ठेवली आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण होत असलेल्या नगर परिषदेपुढे उत्पन्नाचा मुद्दा उभा राहू शकतो. सरकारला गावे समाविष्ट करायची होती, त्यावेळी हरकती-सूचनांची प्रक्रिया तातडीने पार पाडली. अवघ्या दोनच दिवसांत सुनावणीचा फार्स करण्यात आला. गावे समाविष्ट करू नयेत, यासाठी जास्त हरकती होत्या. मात्र, तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांनी गावे समाविष्ट करण्याच्या विरोधातील हरकती विचारात न घेता गावे वगळण्यासाठी आलेल्या कमी हरकतींच्या बाजूने सरकारला कल कळविला. त्यातून हा घोळ निर्माण झाला. आज मागणी मान्य करताना सरकारनेही अर्धवट स्वरूपात निर्णय घेतला आहे.’>उद्या होणार बैठकसंघर्ष समितीच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी होणार असून, त्यात नगर परिषदेला नाव काय द्यायचे, यावर चर्चा होणार आहे. कल्याण उपनगर परिषद हे नाव मान्य नाही. ब्रिटिश राजवटीत कुलाबा हा जिल्हा होता. त्यानंतर, त्याचे नाव रायगड झाले. त्यामुळे नव्या नगरपालिकेचे नाव २७ गावे अथवा मानपाडेश्वर नगर परिषद असेही सुचवले जाऊ शकते.>18गावे नगर परिषदेतीलघेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली, आडिवली ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे.>आॅगस्टमध्ये सुनावणी?कल्याण उपनगर परिषदेसंदर्भात ३० दिवसांत हरकती-सूचनांची सुनावणी होऊ शकते, अथवा या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते.30दिवसांचा कालावधी असल्याने २४ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्यावर जिल्हाधिकारी हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊ शकतात. ही सुनावणी आॅगस्टमध्ये अपेक्षित असू शकते. केडीएमसीची निवडणूक नियोजित वेळेत घेण्याचे आयोगाने स्पष्ट केले असल्याने आॅक्टोबरच्या आधी ही प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.