शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या आढीत आंबा; मनसे-भाजपा कार्यकर्त्यांची फेसबुकवर शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:55 IST

शहरातील भाजप आणि मनसेत सुरू झालेल्या वादाचे निमित्त ठरलेल्या आंब्याचा स्टॉल शनिवारी सकाळी गुंडाळल्यानंतर या वादाचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरूवात झाली आहे.

ठाणे : शहरातील भाजप आणि मनसेत सुरू झालेल्या वादाचे निमित्त ठरलेल्या आंब्याचा स्टॉल शनिवारी सकाळी गुंडाळल्यानंतर या वादाचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरूवात झाली आहे. दिवा -शीळ येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना हिंमत असेल तर स्टॉल सुरु करून दाखव, बायकांच्या आड राहून हुल्लडबाजी करू नकोस, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून आव्हान दिले आहे. त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर टीका करताना खालची पातळी गाठली आहे.याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, निलेश पाटील हा आमच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा भाऊ असून मध्यंतरी त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा इशारा मी गांभीर्याने घेत नाही. मात्र स्टॉल हटवावा लागला याचा राग ठाण्यात १७ मे रोजी काढण्यात येणाºया मोर्चादरम्यान दिसेल असा प्रतिइशारा त्यांनी दिला.विष्णूनगर येथे मनसेकडून शेतकरी बाजाराकरिता मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. तशी परवानगी दिली होती. तेथील शेतकºयाच्या स्टॉलवरून भाजप आणि मनसे कार्यकर्ते गुरुवारी रात्री आमने-सामने भिडले. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले. दरम्यान, या स्टॉलची परवानगी नाकारल्यावर तो स्टॉल कायद्याचे पालन करुन शनिवारी सकाळी बंद केल्याचे मनसेकडून सांगण्यात येते. दरम्यान मनसेने शेतकºयांसाठी १७ मे रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी दुपारी भाजप पदाधिकाºयाने फेसबुकवर पोस्ट टाकून जाधव यांना थेट इशारा दिला. त्यामुळे या पक्षांतील वाद आता सोशल मीडियाकडे वळला आहे. भाजप पदाधिकाºयाच्या पोस्टनंतर मनसे व भाजप कार्यकर्त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठत, एकमेकांना खुलेआम शिवीगाळ सुरू केली आहे. दरम्यान, मनसेच्या अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्ष संदीप लेले यांनी शनिवारी सत्कार केला.लाव रे तो व्हिडीओमुळे चिघळला वादलोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. मोदींच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवण्याकरिता ‘लाव रे तो व्हीडिओ’, अशी हाक ते देत होते व त्यामुळे महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे चिडलेल्या भाजपने मनसेनी लावलेल्या स्टॉलवरून वाद उकरून काढला व त्याला संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले.

टॅग्स :thaneठाणे