शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळाची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 21:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील अल्मेडा चौकामध्ये एका मांडूळाची ५० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तस्लीम देशमुख (५०, रा. ...

ठळक मुद्दे ५५ लाखांमध्ये करणार होता विक्रीमांडूळाला दिले वनविभागाच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील अल्मेडा चौकामध्ये एका मांडूळाची ५० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तस्लीम देशमुख (५०, रा. गुजरात) या रिक्षा चालकाला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. त्याच्या तावडीतून या मांडूळाची सुटका करण्यात आली आहे. त्याला वनविभागाकडे सुपूर्द केल्याचे पोलिसांनी सांगितले.नौपाडा भागातील अल्मेडा चौकातील एक व्यक्ती औषधी पदार्थ आणि काळू जादू करण्याच्या नावाखाली मांडूळाच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, उपनिरीक्षक लभडे, पोलीस नाईक सुनिल राठोड, प्रशांत निकुंभ, चडचणकर आणि कॉन्स्टेबल गोरख राठोड यांच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास तस्लीम या संशयिताला सापळा रचून रायगड आळी, नौपाडा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेमधून चार किलो १५ ग्रॅम वजनाचे आणि ५४ इंच लांबीच्या या मांडूळाची सुटका करण्यात आली. तो या मांडूळाची सुमारे ५५ लाखांमध्ये विक्री करणार होता, अशी कबूलीही त्याने दिली. त्याने हे मांडूळ कोणाकडून आणले? यात आणखी कोणती टोळी सक्रीय आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी