शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 2, 2023 12:42 IST

वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे: मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा या सामाजिक संस्थेतर्फे ठाणे परिसरात ‘संस्कार विज्ञान सोहळा ’हा कार्यक्रम दि. ६ ते ९ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. सीकेपी हॉल व एनकेटी कॉलेज हॉल ठाणे या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपक्रमांची आखणी केली आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ६ जानेवारी २०२३ रोजी स. १० वा. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रमुख पाहुणे स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वासलेकर,सोहळ्याचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे असतील. 

शनिवार, ७ जानेवारी २०२३ रोजी संध्या. ५.१५ वाजता ठाणे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ‘सन्मान सत्कृत्याचा’ ह्या सत्रात होणार आहे. हा सन्मान डॉ. अशोक मोडक (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ), विजय बाविस्कर (समूह संपादक लोकमत), रेणू गावस्कर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते होणार आहे. श्यामश्री भोसले, रती भोसेकर, गणराज जैन, प्रसाद कर्णिक. गीता शहा, सतीश धुरत, भटू सावंत, डॉ. उल्का नातू हे सत्कारमूर्ती  आहेत. 

रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी संध्या. ५.१५ वाजता युवकांसाठी -दीपस्तंभांच्या शोधात… हे युवा संवाद सत्र होणार आहे. या उपक्रमात युवा समाजसेवक अमृत अभय बंग, ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे आणि सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी व लेखक प्रवीण दवणे संवाद साधणार आहेत. तर समारोप समारंभ सोमवार, ९ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता होईल. ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. अनिल काकोडकर, प्रमुख पाहुणे दीपक घैसास, ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ व उद्योजक, समारंभाचे अध्यक्ष :  विजय कुवळेकर, हे असणार आहेत. याशिवाय, दररोज विविध विषयांवर विनामूल्य विवेचने असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यासयश, पालकांसाठी विवेकी पालकत्व, तरुणांसाठी यौवनातील महत्वाकांक्षा, मोठ्यांसाठी कुटुंबसौख्य, ताणव्यवस्थापन, मत्सरघात आणि वास्तुशुद्धी, मनोधैर्यासाठी ध्यान, १ ते ७ वयोगटातील मुला-मुलींच्या पालकांसाठी बालकाची मेंदूक्रांती, गर्भधारणेच्या पूर्वतयारीसाठी सुप्रजनन, ज्येष्ठांसाठी सुखद जीवनसंध्या इ. विषय हाताळले जाणार आहेत. 

वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. मनशक्ती केंद्राचे वैशिष्ट्य असलेल्या माइंड जिम प्रकल्पातील माइंड ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्ष पाहायला आणि करायला मिळणार आहेत. मानस यंत्र चाचण्यांमध्येही सहभाग घेता येईल. चाचणी झाल्यावर त्याचा रिझल्ट दिला जाईल व त्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. विविध विषयांवरील प्रदर्शन व ग्रंथ साहित्य प्रदर्शनही असणार आहे. याशिवाय, रोज संध्याकाळी ७ वाजता मुख्य विवेचन होणार आहे.

गर्भसंस्कार, सुजाण पालकत्व, आरोग्य प्राप्ती, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शिवाय सर्वकल्याणासाठी सामुदायिक सत्यपूजा, ३ ते ६ वयोगटातील मुले-मुली व पालकांसाठी मेधासंस्कारही आयोजित केले आहेत. अधिक माहिती साठी संपर्क ९७६९९०६७२६ अथवा www.manashakti.org या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :thaneठाणे