शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील ‘मॅनेजर’ला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 00:52 IST

स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई चार तरुणींची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोड येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८, रा. गोंडा, उत्तरप्रदेश, हल्ली रा. अंधेरी, मुंबई) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अ‍ॅन्ड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील या स्पामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या पथकाने बनावट गिºहाईक पाठवून या प्रकाराची खात्री केली. तेंव्हा तिथे मागणीनुसार शरीर विक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा या गिºहाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या तावडीतून या चार मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट