शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खांडपे गावाचा कारभार तरुणीच्या हाती; अक्षता वाघचौडे झाली सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 02:00 IST

तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खांडपे गावाची ओळख आहे. या गावात प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती या सरकारी नोकरीत आहे. तर, काही जण हे स्वतंत्र व्यवसाय करतात.

मुरबाड : तालुक्यात सर्वात लहान वयात सरपंच होण्याची संधी खांडपे येथील अक्षता मदन वाघचौडे या २४ वर्षीय तरुणीस मिळाली आहे. ती या गावाची कारभारीण म्हणून काम पाहणार आहे.तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खांडपे गावाची ओळख आहे. या गावात प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती या सरकारी नोकरीत आहे. तर, काही जण हे स्वतंत्र व्यवसाय करतात. हे गाव राजकारणापासून कोसो दूर असून या गावात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडल्या जातात. गावाच्या विकासासाठी योग्य उमेदवाराला संधी दिली जाते.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अक्षता हिच्या अंगी असणारे कौशल्य व महिला संघटना तसेच गावाच्या विकासासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी करावी, याचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते. याचा ग्रामस्थांनी विचार करून अक्षता हिला बिनविरोध निवडून दिले. मात्र, त्यावेळी सरपंचपदाचे आरक्षण पडलेले नसल्यामुळे सर्व ग्रामस्थ अक्षता हिला सरपंचपदाची संधी कशी मिळेल, या प्रयत्नात होते. बुधवारी झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत खांडपे गावात अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने तिचा सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला. गावाच्या विकासासाठी तरुण कारभारीण लाभली म्हणून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.माझे गाव हे सुशिक्षित, सुसंस्कृत असून ते राजकारणविरहित गाव म्हणून तालुक्यात परिचित आहे. ते समस्यामुक्त व विकसित गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील एक आदर्श गाव करण्याचा माझा प्रयत्न राहील. - अक्षता वाघचौडे, सरपंच, खांडपे