शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला!

By पंकज पाटील | Updated: June 20, 2023 15:00 IST

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात इसमाची गळा चिरून हत्या

अंबरनाथ : अनैसर्गिक संबंधांचा हव्यास एका इसमाच्या जीवावर बेतल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या इसमाने दारू पाजण्याच्या बहाण्याने सहकाऱ्याला घरी आणत त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या सहकाऱ्याने थेट त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली.

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यातील मगर चाळीत कृष्णानंद मुनियन राहत होता. तो एमआयडीसीतील एका कंपनीत फेब्रिकेशनचे काम करत होता. रविवारी रात्री कंपनीतून येताना त्याने कंपनीतील एका सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या निमित्ताने घरी आणले. तसेच दारू पिऊन झाल्यानंतर उशीर झाल्याने तिथेच मुक्काम करण्यास सांगितले. यानंतर रात्रीच्या सुमारास कृष्णानंद याने या सहकाऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या या सहकाऱ्याने त्याच्याच घरातील चाकू घेऊन कृष्णानंद याचा गळा चिरला आणि तिथून निघून गेला.

सकाळी कृष्णानंदच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दार उघडले नाही. बराच वेळ दार उघडत नसल्यामुळे अखेर दार तोडून घरात प्रवेश केला असता कृष्णानंदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भाव घेतली. यानंतर काही वेळातच संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णानंद याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने चिडून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. 

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारी