शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अवघ्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग करणाºया ओमप्रकाश गिरी (५०, रा. ...

ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अवघ्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग करणाºया ओमप्रकाश गिरी (५०, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट, अंबिकानगर येथे राहणाºया एका २८ वर्षीय महिलेने तिच्या या पिडित मुलीला दही आणण्यासाठी ९ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास जवळच्याच दुकानावर पाठविले होते. त्यावेळी ओमप्रकाश याने या मुलीशी अश्लील चाळे केले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारासही घराजवळ ही मुलगी खेळत असतांना त्याने तिला जवळ घेत ‘तसाच’ प्रकार केला. याची माहिती मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ओमप्रकाश याच्याविरुद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनयमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वैशाली रासकर आणि उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ यांनी आरोपी ओमप्रकाश याला अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी