शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:00 IST

'मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

ठळक मुद्देराज ठाकरेंसह अनेक राजकारणी, कलाकार मामलेदार मिसळीचे चाहतेमहाराष्ट्राची मिसळ जागतिक पातळीवर नेण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं योगदानमामलेदार मिसळीची महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात ख्याती

ठाणेमहाराष्ट्राचे 'मिसळसम्राट' अशी ख्याती असलेले सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  'मामलेदार मिसळ' हा ठाण्याचा ब्रँड त्यांनी निर्माण केला.

'मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. त्यानंतर आज 'मामलेदार मिसळ' हा एक ब्रँड झाला आहे. ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे २७ वर्ष ते खजिनदार होते.

लक्ष्मण मुर्डेश्वर त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केले होते. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 

कलाकार ते राजकारणी मंडळी मामलेदार मिसळीचे चाहतेमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मामलेदार मिसळी'चे चाहते आहेत. गेल्याच वर्षी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला होता. यावेळी अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी दुकानाबाहेर राज समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज यांच्यासोबतच नारायण राणे देखील ठाण्यात असले की मामलेदार मिसळ आवर्जुन मागवून घेतात. इतकेच नव्हे, तर विधीमंडळाच्या अधिवेशनातही नारायण राणे ५०० ते ६०० प्लेट मिसळ थेट मुंबईला मागवून घ्यायचे आणि सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मेजवानी द्यायचे.  अनेक कलाकार मंडळीही देखील मामलेदार मिसळ चाखण्यासाठी येत असतात. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रयोगासाठी येत असताना 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद घेण्यासाठी अनेक कलाकार आवर्जुन येत असतात.

टॅग्स :thaneठाणेfoodअन्न