शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माळशेजचा पर्यटक रोडावला; धबधब्यांवर पोलीस व्हॅनचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:51 IST

सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या फतव्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले.

सुरेश लोखंडेठाणे : सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या फतव्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. धबधब्यांच्या जवळपासही फिरकू दिले जात नाही. माळशेज घाटातील चारही धबधब्यांवर पोलीस व्हॅन तैनात आहेत. यामुळे येथील पर्यटक रोडावल्याचे टोकावडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.सी. पोरे यांनी सांगितले.माळशेजमध्ये प्रारंभीच्या पावसात पर्यटकांनी गर्दी केली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीकेण्डच्या कालावधीत ४४ पोलीस कर्मचारी तैनात करावे लागले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, घाटात दारूबंदी आदी पर्याय अमलात आणले. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.मद्यपींवर करडी नजरजिल्हाधिकाºयांच्या बंदीमुळे आता शहरातील पर्यटक माळशेजमध्ये येण्यास नेहमीप्रमाणे धजावत नाहीत. घाटातील महामार्गावर पोलिसांची सतत पेट्रोलिंग आहे. याशिवाय, घाटातील चार मोठ्या धबधब्यांच्या परिसरात पोलीस व्हॅन तैनात केलेल्या आहेत. घाटात शिरण्याआधी पोलिसांकडून तपासणी होत आहे. मद्यसाठा बाळगण्यास आधीच मनाई आहे.तीन अधिका-यांचे पथकधबधब्यांवर जिल्हाधिकाºयांच्या प्रतिबंधात्मक नोटीसचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. त्यात दरडी कोसळण्याच्या दोन घटना मागील आठवड्यात अंतराने घडल्या. या घटनांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात थंडावली. महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीन पोलीस अधिकाºयांचे पथक घाटात तैनात असल्यामुळे मनमानी पर्यटकांना आळा घालणे शक्य झाल्याचे पोरे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :thaneठाणे