शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:24 IST

लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत कायम : ठामपाचा निर्णय, मुंबईच्या तुलनेत ठाण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असल्याने चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यभरात १ आॅगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध महाराष्ट्र सरकारने शिथिल केले असले, तरी ठाण्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम आहे. यात राज्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सला ५ आॅगस्टपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी ठाण्यात मात्र मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स, जिम व स्विमिंग पूल सुरू करण्याबाबतचे निर्बंध अद्यापही कायम राहणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे शहरात आधीच कडक लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, तो सुरू असतानाही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या मुंबईपेक्षा ठाण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. ही बाब ध्यानात घेऊनच ठाणे महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात नव्याने सुरू झालेला लॉकडाऊन १९ जुलैपासून शिथिल केला होता. हॉटस्पॉटमध्ये तो अद्याप कायम असून, तो आता ३१ आॅगस्टपर्यंत कायम राहणार आहे.भाजीमंडईसह बाजारपेठांना : समविषम तत्त्वावर परवानगीलॉकडाऊनच्या काळात मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व भाजीमंडया, बाजारपेठा आणि दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सम व विषम तत्त्वावर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अटी व नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.स्पॉट क्षेत्रेकळवा प्रभाग समिती : भाविक विद्यालयाच्या लगतचा भाग, विठ्ठल मंदिर रोड, बुबेरा रोड, दत्तवाडी, मुंबई-पुणे रोड (दक्षिण), गजानन महाराज मंदिर (पूर्व), ६० फूट रोड (पश्चिम), वास्तू आनंद कॉम्प्लेक्स, गोविंदधाम सोसायटी, कळवानाका, मुंबई-पुणे रोड (उत्तर), चेऊलकर रोड (पश्चिम), जानकीबाई साळवी मार्केट रोड, शिवाजीनगर, शिवाजीनगर मार्केट, शिवाजी तलाव, विटावा.माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती : आझादनगरचा भाग, जैन मंदिर रोड, मनोरमानगर, ढोकाळी छबिया पार्क मधील इमारती, कापूरबावडी.उथळसर प्रभाग समिती : वृंदावन सोसायटी फेज २, मुंबई-आग्रा हायवे, रोड न ३, रुस्तमजीकावेरी इमारत रुस्तमजी एक्वा इमारत, निकमगुरुजी रोड, इमारत क्रमांक ३१ ए,२६ ए, साईदीप कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर तलावालगतचा भाग, महादेव गोपाल पाटील रोड नितीन कंपनीसमोरील भाग, नामदेव वाडी भाग.वागळे प्रभाग समिती : शांतीनगरचा भाग, आयटीआय इमारत, किसनगरचा भाग, तानसा पाइपलाइन,नेपच्यून एलिमेंट वाणिज्य इमारत,आश्रम रोड.नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : आनंदनगर, दौलतनगर,साई एकवीरा सोसायटी कोपरी, महापालिका शाळा सिंधी कॅम्प इमारत क्रमांक २२,कृष्णा बोरकर मार्ग,पारशीवाडी गुरुनानक सोसायटी,हरिश्चंद्र राऊत मार्ग, प्रेमनगर सोसायटी, चेंदणी कोळीवाडा, पारसीयन रोड, मीठबंदर रोड.वर्तकनगर प्र. समिती : हॅपी व्हॅली होम्स, टिकुजिनीवाडी रोड, कांचन पवारनगर, वसंत विहार, धर्मवीरनगरचा भाग, तुलसीधाम रोड, वर्तकनगर, भीमनगर, वसंत लॉन्स, गणेशनगरचा भाग.लोकमान्य - सावरकरनगर : यशोधननगर, लोकमान्य बसस्टॉप, दोस्ती रेंटल, संभाजीनगरचा भाग, लोढा पॅराडाइज, कामगार हॉस्पिटल, रामचंद्रनगरचा भाग.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक