शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पार्किंगच्या नावावर गोळा होतो लाखो रुपयांचा मलिदा; खासगी मालकीच्या भूखंडांवर वाहने

By जितेंद्र कालेकर | Updated: January 9, 2024 09:16 IST

ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण याच पार्किंग माफियांनी रोखून धरल्याचे बोलले जाते

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात काही खासगी मालकीच्या भूखंडांवर वाहने पार्किंग करून जागामालक लाखो रुपयांचा मलिदा गोळा करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण याच पार्किंग माफियांनी रोखून धरल्याचे बोलले जाते. अशा खासगी पार्किंग प्लॉटमधून जमीन मालक महिन्याकाठी लाखोंची कमाई करीत असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या पोखरण रोड क्रमांक दोन या ठिकाणच्या तळ अधिक तीन मजली वाहनतळामध्ये शेकडो भंगार रिक्षा गेल्या दोन वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहने रस्ते अडवून उभी केली जातात.

ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण कागदावर आहे. याचाच गैरफायदा रेल्वेस्थानक परिसरात खासगी पार्किंगची व्यवस्था करणाऱ्या काही मंडळींनी घेतला आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांचे पार्किंग करण्याकरिता खासगी भूखंड उपलब्ध करून देऊन त्यांनी आपले दुकान थाटले आहे. खासगी पार्किंग हा मोठा धंदा झाला आहे.

ठाण्यात रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे, ठाणे महापालिका आणि खासगी जागांवर वाहनतळ आहेत. रेल्वे आणि ठाणे महापालिकेने ठेक्यावर गावदेवी मैदानाजवळ चालविण्यासाठी दिलेल्या जागा वाहनांच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे खासगी मोक्याच्या ठिकाणच्या मोकळ्या निवासी जागा सर्रास भाड्याने किंवा विकत घेऊन वाहनतळ थाटण्यात आले आहे.

सिडको बसस्टॉपजवळ तांडेल यांनी त्यांच्या खासगी जागेत लकी स्कूटर स्टँड हे तळ अधिक एक मजली वाहनतळ सुरू केले आहे. सुमारे ४०० दुचाकींची या ठिकाणी क्षमता असून, १२ तासांसाठी ३०, तर २४ तासांसाठी ६० रुपये आकारले जातात. तर महिना ७०० रुपये दुचाकींसाठी घेतले जातात. यातून चार कामगारांच्या पगाराचे ५० हजार रुपये वगळल्यास तीन ते साडेतीन लाखांचा गल्ला महिनाभरात होतो.

गाडीचे कव्हर आणि हेल्मेटची कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नसल्याचे सांगण्यात येते. थाेड्याफार प्रमाणात असेच दर स्टेशन परिसरातील वाहनतळांवर देण्यात आले आहेत.

पोखरणच्या पार्किंगमध्ये लूट

  • दुचाकी वाहनासाठी महिना २५०, रिक्षासाठी ३००, तर चारचाकी वाहनांसाठी महिना ८०० ते १००० रुपये आकारले जातात. दिवसाकाठी रिक्षाचालकांकडून ३० रुपये घेतले जातात. 
  • बहुतांश वाहनमालक दररोजऐवजी महिनाकाठी या ठिकाणी वाहने उभी करतात. मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या या दर आकारणीबाबत वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.

विनाक्रमांकाची आणि चोरीचीही दुचाकी

  • ठाणे स्टेशनजवळील एका खासगी वाहनतळावर विनाक्रमांकाची दुचाकी काही दिवसांपूर्वी लावण्यात आली होती. संबंधित वाहनतळ चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 
  • एकाने चोरीची गाडी पार्किंगमध्ये उभी करून तो पसार झाला होता. काहीवेळा सोनसाखळी चोरही कोपरीतील एका पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून पसार झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. खासगी पार्किंगमधून दोनवेळा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

पालिकेच्या वाहनतळात भंगार वाहनांची गर्दी

पोखरण रोड क्रमांक दोन गांधीनगर भागात ठाणे महापालिकेचे तळ अधिक तीन मजली वाहनतळ आहे. नाथा कदम यांच्या ऑटो फॅब या खासगी कंपनीला हा ठेका दिलेला आहे. उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला, तर २५ टक्के रक्कम ठेकेदाराला मिळते. या वाहनतळामध्ये ६० ते ७० दुचाकी, १२ चारचाकी, ७० ते ८० रिक्षा बसतील इतकी जागा आहे. सध्या तळमजल्यावर १८ आणि पहिल्या मजल्यावर कचरावाहक ५८ घंटागाड्या ठेवल्या आहेत. एकीकडे पार्किंगला जागा अपुरी पडत असताना कोरोनाच्या लॉकडाऊन काळापासून या ठिकाणी ५० ते ६० रिक्षा उभ्या केल्या आहेत. त्यांचे चालक त्यानंतर फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे वाहनतळ भंगार रिक्षांनी व्यापले आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंग