ठाणे : पुण्यातील शिक्षण संचालनालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काका-पुतण्यांना साडेपाच लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मुंबईतील तुळशीदास जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथील रिक्षाचालक कदम यांना त्यांचा मुलगा वैभवला शिक्षण संचालनालय विभागात १४ महिन्यांपूर्वी सरकारी नोकरी लावतो, असे जाधवने सांगितले. त्याकरिता, तीन लाख लागतील. त्यानुसार, ७ जून २०१५ रोजी घोडबंदर रोड येथील एका हॉटेलमध्ये तीन लाख रुपये घेतले. त्याचप्रमाणे, त्यांचा पुतण्या अनिललाही नोकरी लावतो सांगून अडीच लाख रुपये घेऊन त्यास शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाच्या लेटरहेडवर १४ मे २०१५ तसेच २९ मे रोजीचे परिपत्रक आणि शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या नियुक्तीसाठीची नाहरकत निवड सूची अशा बनावट कागदपत्रांची झेरॉक्स प्रत दिली. अशा प्रकारे, दोघांची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.तसेच दुसऱ्या घटनेत बदलापूर, कुळगाव येथे राहणाऱ्या फिर्यादींना रेमण्ड कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यावरून राजेश गानेरीवाला यांना रेमण्ड कंपनीत सिनियर मॅनेजर पदाकरिता निवड झाली आहे, असे सांगून सुरक्षा रक्कम म्हणून नऊ हजार ९९८ रु पये भरण्यास सांगून फसवणूक केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीसात तक्रार आहे.
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गंडा
By admin | Updated: October 1, 2015 01:41 IST