शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2018 : ड्रायफ्रुट्स, टुटीफ्रुटी, सुक्या खोब-याचा लाडवांत वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:02 IST

मावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्हरायटीजमध्ये यंदा ‘तीळ मावा कतली’ नव्याने बनवण्यात आली आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : मावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्हरायटीजमध्ये यंदा ‘तीळ मावा कतली’ नव्याने बनवण्यात आली आहे. महाराष्ट्रीय खवय्ये तीळगूळ बोरिंडाला, तर सिंधी समाजातील खवय्ये मावा तीळ बोरिंडा आणि हनी तीळ बोरिंडाला पसंती देत असल्याचे दुकानमालकांनी सांगितले.रविवारी मकरसंक्रांत असल्याने शनिवारीच तिळगुळाच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी उसळली होती. ही गर्दी रविवार सकाळपर्यंत असेल, असे मिठाईच्या दुकानाचे मालक मनीष चांदवानी यांनी सांगितले. तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू, काटेरी हलवा हे दरवर्षी बाजारात उपलब्ध असतात. परंतु, संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळावर वेगवेगळे प्रयोग करून अनोख्या व्हरायटीज तयार केल्या जातात. तीळ मावा रोल, तीळगूळ बोरिंडा, कडक तीळ बोरिंडा, तीळ बोरिंडा लाई, तीळ बोरिंडा चिक्की या व्हरायटीजचा त्यामध्ये समावेश होता. वेगवेगळ्या मिठाईसारखेच आकार या तिळगुळाच्या व्हरायटीजना दिले असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षी आम्ही तीळ मावा रोल बनवला होता. यंदा तीळ मावा कतली बनवली असल्याचे मनीष यांनी सांगितले. हे सर्व पदार्थ ड्रायफ्रुट्सयुक्त आहेत. तिळगुळाच्या लाडवांमध्ये टुटीफ्रुटी आणि सुके खोबरेदेखील वापरण्यात आले आहे. हे सर्व पदार्थ गुळाबरोबर साखरेतही बनवले आहेत. परंतु, गुळाच्या पदार्थांनाच अधिक मागणी असल्याचे मनीष म्हणाले.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८