शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून! पुढे धडधडत मेल एक्स्प्रेस गेली, मागून लोकल आली; पावसाळ्यापासून त्याचठिकाणी तीनदा खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 10:59 IST

रेल्वे चे अधिकारी ,कर्मचारी 2 किलोमीटर ची पायपीट करीत घटनास्थळ दाखल झाले व दुरुस्ती चे काम सुरु केले .

- शाम धुमाळ

कसारा : कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील कसारा उबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान  रेल्वे रुळा खालील खडी चा भरावं खचून खड्डा पडल्याने आज सकाळी 6,20 पासून  कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून रेल्वे चा मोठा अनर्थ टळला.

आज सकाळी 6 वाजे च्या दरम्यान कसारा उबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान कल्याण कडे जाणाऱ्या वाहिनी वरील  रेल्वे रुळा खालील खडी अचानक दबली गेली व अचानक मोठा खड्डा त्या ठिकाणी तयार झाला होता. याचं दरम्यान एक मेल एक्सप्रेस भरधव वेगात कल्याण दिशे कडे रवाना झाली. त्यामुळे रेल्वे रुळा खालील खडी जास्त प्रमाणात खचून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. ही बाब मेल एक्सप्रेसच्या मागून येणाऱ्या कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल च्या मोटरमन व काही प्रवाशाच्या  लक्षात आली. लोकलच्या मोटरमन ने लोकल  हळूहळू उबरमाळीच्या दिशेने नेली व रेल्वे रुळा खालील घटनेबाबतची माहिती उबरमाळी, कसारा ,रेल्वे स्टेशन मास्तर ,.व रेल्वे च्या नियंत्रण कक्षाला दिली .

 त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक काही काळ रोखून धरली .घटनेची माहिती उपलब्ध होताच  रेल्वे चे अधिकारी ,कर्मचारी 2 किलोमीटर ची पायपीट करीत घटनास्थळ दाखल झाले व दुरुस्ती चे काम सुरु केले .पडलेल्या भगदाड (खड्डा) च्या ठिकाणी तात्काळ दगडी टाकून त्यावर खडी भरलेल्या गोण्या टाकून भराव तयार केला भरावं  करून रेल्वे ट्रॅक ला  तात्पुरता मजबूती देऊन धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु केली..दरम्यान या मुळे आज सकाळी एक कसारा मुबई सी.एस.टी लोकल रद्द करण्यात आली  .परिणामी या मुळे चाकरमानी प्रवाशांसह शालेय विध्यार्थी,परीक्षार्थी  यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.कायम स्वरूपी उपाययोजना नाही.दरम्यान आज ज्या ठिकाणी खडी दबल्याने खड्डा पडला त्या ठिकाणी या अगोदर दोन वेळा पावसाळ्यात असा प्रकार घडला होता  परंतु त्या वेळी सुद्धा तात्पुरता काम केले होते दरम्यान तात्पुरता मलम पट्टी करून वेळ मारून न्यायचे काम करणाऱ्या रेल्वे प्रशासना मुळे एक दिवस मोठा अनर्थ होऊ शकतो.दैव बलवत्तर म्हणून...दरम्यान या कमकुवत रेल्वे ट्रॅक वरून भरधाव वेगात गेलेली मेल एक्सप्रेसच्या वेगाने व वजनाने भराव खचलेल्या ठिकाणचे रेल्वे ट्रॅक तुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता.कल्याण कसारा रेल्वे वाहतूक सेवा नियमित कोमात.दरम्यान कल्याण कसारा रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक कायम या ना त्या कारणाने विस्कलीत असते त्यामुळे या मार्गावर रोज प्रवास करणारे चाकरमानी प्रवासी पुरते वैतागले असून प्रवशाच्या समस्या सोडविण्यासाठी  कार्यरत असलेल्या प्रवासी संघटना या कुचकामी ठरत आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlocalलोकल