शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील महिषासुराचे मर्दन होणारच - अंबादास दानवे

By अजित मांडके | Updated: October 16, 2023 22:44 IST

आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली.

ठाणे : सामान्य शिवसैनिक म्हणून मी ठाण्यात येऊन टेभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेतले. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे, महिषासुराचे मर्दन  करणारी आहे आणि मला वाटतं  महाराष्ट्रात जे जे महिषासुर निर्माण झाले आहेत त्याचे मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही. असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.          आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली. आशिष शेलारांना इतिहास कमी माहिती असेल, आज एनडीएमध्ये कोणते कोणते पक्ष कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा मुलायम सिंग होते, फर्नांडिस होते हे कोणत्या विचारांचे होते, मधू दंडवते होते ते कोणत्या विचारांचे होते . हे सर्व समाजवादी विचारांचे होते , आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचे दानवे म्हणाले. 

मागील वर्षी वातावरण वेगळे होते. मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी ड्युब्लिकेट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आमचा एक नेता, एक झेंडा एक मैदान असल्याचेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आरक्षणाची आम्हीही वाट बघत आहोतमराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिले आहे. मी सुद्धा  मराठवाड्यातील आहे.  मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे . आम्ही मराठवाड्यातील लोक  या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजनल आहे. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे