शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महेश पाटीलसह नऊ जणांवर ठपका, दोन हजार पानांचे दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:26 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या नऊ जणांविरोधात ठाणे खंडणीविरोधी पथकाने नुकतेच कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते जवळपास दोन हजार पानी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.भिवंडी तालुक्यातील कुडूस येथे एका दरोड्याच्या तपासात १३ डिसेंबरला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. या आरोपींनी तपासादरम्यान नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी महेश पाटील यांनी दिल्याची कबुली दिली. त्यानुसार, याप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबरला महेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तपासात हत्येचा कट डोंबिवलीत शिजल्याने हा गुन्हा शहर पोलिसांच्या मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर, याचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने महेश पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने शरणागती पत्करावी, असे आदेश दिले. त्यानंतर, त्याच्यासह तिघांनी १९ जानेवारी रोजी न्यायालयात शरणागती पत्करली होती. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.याप्रकरणी शहर पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या १,९३० पानी दोषारोपपत्रामध्ये आरोपींनी ज्या ठिकाणी कट रचला, त्याठिकाणचे लोकेशन्स, त्या ठिकाणचा पंचनामा आणि जप्त केलेला हत्येसाठी लागणारा शस्त्रसाठा याच्यासह आदी पुरावे दोषारोपपत्रात नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.