शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या शक्तिप्रदर्शनाने शहरात वाहतूककोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 00:38 IST

आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला, तेव्हाही आघाडीकडून शक्तिप्रदर्शन झाले.

डोंबिवली : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांनी अर्ज भरल्याने या मतदारसंघात आता ३६ उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीने केलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनाचा फटका वाहतुकीला बसला. सर्वसामान्यांना त्यामुळे नाहक त्रास झाला. गर्दीमुळे उमेदवारी अर्जाचा मुहूर्त चुकू नये, यासाठी अखेर श्रीकांत शिंदे यांनाही रॅली सोडून दुचाकीने निवडणूक कार्यालय गाठावे लागले.

आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला, तेव्हाही आघाडीकडून शक्तिप्रदर्शन झाले. त्यावेळी झालेल्या वाहतूककोंडीत ‘मतदार’ वेठीला धरले गेल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी याचीच पुनरावृत्ती घडली. श्रीकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करताना सेनेसह भाजपा, रिपाइं, श्रमजीवी संघटना आणि रासप या महायुतीच्या घटक पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणूक रॅलीत महिलांचे लेझीम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासीबांधवांचे तारपा नृत्य आणि विकास योजना, पर्यावरण संदेश देणारे चित्ररथ यांचा समावेश होता. ठाण्यापासून ते बदलापूर, भिवंडी तसेच आसपासच्या भागातून महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीने आधीच कोंडी झाली असताना, नेत्यांच्या ताफ्यांनी यात भर पडली. नेत्यांच्या वाहनांसह कार्यकर्त्यांच्या बसगाड्यांनी श्री गणेश मंदिर परिसरातील लहान गल्ल्याही व्यापल्याने या परिसरात चोहोबाजूंनी वाहतूककोंडी झाली.

शिंदे यांनी श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला प्रारंभ केला. अप्पा दातार चौक, फडके मार्ग, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, मानपाडा चाररस्ता, कल्याण रोड, घरडा सर्कल आणि क्रीडासंकुल अशी रॅली काढण्यात आली. कोंडीमुळे बहुतांश वेळ वाहने एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्ता सोडून अंतर्गत रस्त्यांनी क्रीडासंकुल गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंतर्गत रस्तेही जॅम झाले.
दुचाकीने गाठले कार्यालयश्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी दुपारी १२.३३ चा मुहूर्त काढण्यात आला होता; मात्र ९ वाजता प्रारंभ होणारी रॅली साडेअकराच्या आसपास सुरू झाली. त्यात वाहतूककोंडीमुळे मुहूर्त चुकत असल्याचे पाहून शिंदे यांनी रॅलीमधील रथ सोडून दुचाकीने निवडणूक कार्यालय गाठले. दुचाकीवर त्यांचे सारथ्य भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे यांनी केले. हे दृश्य पाहून आता खऱ्या अर्थाने युती झाल्याची टिप्पणी काहींच्या तोंडून आपसूकच निघाली. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या अन्य उमेदवारांनाही या कोंडीचा त्रास झाला.
दिग्गजांची उपस्थितीरॅलीत शिवसेना, भाजपा, रिपाइं आदींच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthane-pcठाणेkalyan-pcकल्याण