शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचा ‘तारा’ चमकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 01:32 IST

३५० लघुपटांतून झाली निवड : देवदासी प्रथेमधील गैरकृत्यांवर प्रकाश, कल्याण-डोंबिवलीतील कलाकारांचा समावेश

जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : राजस्थान फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातून ‘तारा’ या एकमेव मराठी लघुपटाची निवड झाली असून सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला आहे. ‘तारा’ हा लघुपट देवदासी प्रथेच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे. ‘तारा’ नावाच्या एका मुरळीची ही कहाणी आहे, अशी माहिती लघुपटाचे दिग्दर्शक आकाश कांबळे यांनी दिली. या लघुपटातील कलाकार कल्याण, डोंबिवली, आंबिवली या परिसरांतील असून बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी आहेत.

राजस्थान येथे नुकताच डेजर्ट एज ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल पार पडला होता. या फेस्टिव्हलमध्ये ‘तारा’ या लघुपटाची सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड झाली. संपूर्ण जगभरातून ३५० लघुपट या फेस्टिव्हलमध्ये आले होते. त्यातील ४८ निवडण्यात आले. ‘तारा’ या लघुपटाचे कथालेखक सतीश खडके असून नोव्हेंबर २०१७ ला त्यांनी ही कथा लिहिली. त्यानंतर, त्यांनी ही कथा वाचून दाखवली. ही कथा भावल्यामुळे तिच्यावर नंतर अभ्यास सुरू झाला.या लघुपटाविषयी दिग्दर्शक कांबळे म्हणाले की, जेजुरी, अहमदनगर या ठिकाणी अडीच महिने फिरत होतो. ज्याठिकाणी या मुरळ्या भेटत होत्या, तेथे त्यांच्या आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगांची नोंद घेऊन त्यावर कथेचा दुसरा भाग तयार केला. या लघुपटाची संकल्पना तयार होती, मात्र प्रत्यक्ष भेटल्यामुळे कथा परिपक्व झाली. त्यांच्या वेशभूषेचा, बोलण्याच्या ट्युनिंगचा अभ्यास करता आला. त्यानुसार, कथानकांचे डायलॉग लिहिण्यात आले. या लघुपटाचे चित्रीकरण कोल्हापूर आणि जेजुरी या दोन ठिकाणी झाले आहे. मे २०१८ मध्ये या लघुपटाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती.प्रियंका जावळे, रोशनी राजभर, निकिता जंगम, स्वाती वर्मा यांनी सहायक कलाकार म्हणून इतर मुरळ्यांचे काम केले होते. विकास सांगळे, किरण केंडे, गणेश वाघमारे, सौरभ बामणे, जितेंद्र कांबळे, अजित कांबळे, पवन व्हामने, नितीन कांबळे या कलाकारांनीही भूमिका केल्या आहेत. या कथेतून समाजाला संदेश द्यायचा उद्देश नव्हता, तर ही प्रथा समाजात बंद असली, तरी अप्रत्यक्षरीत्या सुरू आहे. मुरळीचे जे दु:ख दिसले, ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आपण नेहमी पाहतो, पण त्यांना कधीही आपण जाणले नाही. हा लघुपट ४३ मिनिटे २७ सेकंदांचा आहे. याशिवाय, अनेक फेस्टिव्हलमध्ये ही फिल्म पाठवली आहे. त्यांचा रिझल्ट येणे बाकी आहे. या लघुपटातील सर्व कलाकार हे कल्याण, डोंबिवली, आंबिवली या परिसरांतील असून बिर्ला महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी आहेत. गणेश वाघमारे आणि जितेंद्र कांबळे वगळता कुणीही अभिनयाच्या क्षेत्रात नाही. इतर सर्व कलाकारांना अडीच महिने वर्कशॉप घेऊन प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.आकाशचा दुसरा लघुपटआकाश हा तीन वर्षांपासून फिल्म मेकिंगचे काम करत आहे. त्याने प्रथम ‘उंबरठा’ हा लघुपट तयार केला होता. ‘उंबरठा’ या लघुपटातील नायिकेच्या बहिणींनी घरातून पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे तिला काय सहन करावे लागते, हे सांगितले आहे. ‘तारा’ ही आकाशची दुसरी निर्मिती आहे. ‘उंबरठा’ या लघुपटाला पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून घोषित करण्यात आले होते. याशिवाय, लायटिंग आणि डिझाइन यासाठीचे पारितोषिक अजिंक्य केणे याला मिळाले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे