शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: कल्याण-डोंबिवलीत युतीमध्ये व्हावे जागांचे समसमान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:34 IST

कल्याण पश्चिमेवर सेनेचा दावा; इच्छुक भेटले पालकमंत्र्यांना

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला घेण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार हे विद्यमान आमदार आहेत. वास्तविक, हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघात शिवसेनेचे १८ नगरसेवक आहेत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला पाहिजे, या मागणीसाठी कल्याण पश्चिमेतून इच्छुक असलेले शिवसेनेचे प्रकाश पेणकर, विश्वनाथ भोईर, रवी पाटील, अरविंद मोरे, सचिन बासरे, श्रेयस समेळ, मयूर पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांची भेट घेतली.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी कल्याण पूर्व, डोंबिवली हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्यास शिवसेनेचे प्राबल्य असलेले उर्वरित दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले पाहिजेत, अशी मागणी इच्छुकांच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा निर्विवाद दावा आहे. कल्याण पूर्वेत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपला समर्थन दिल्याने भाजपकडून ते दावेदार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेची जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा पूर्वापार भाजपच्याच वाट्याला आहे. कल्याण पश्चिमची जागा भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्यामुळे भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या सर्व मुद्यांवर चर्चा सुरू आहे. कल्याण पश्चिमेवर आपण दावा केल्याचेही त्यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील विधानसभेच्या चार जागांपैकी तीन जागा भाजपकडे जाणार असतील आणि शिवसेनेच्या वाट्याला केवळ एकच जागा येत असेल, तर तो असमतोल असल्याचे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे चारपैकी दोन जागा शिवसेनेला व दोन जागा भाजपला देण्याची आणि कल्याण पश्चिमेची जागा भाजपला देण्याऐवजी शिवसेनेने स्वत:कडे ठेवावी, असा आग्रह या इच्छुकांनी केला आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यावेळी भाजपने बंडखोरी केल्याने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मनसेचे प्रकाश भोईर निवडून आले होते. २०१४ साली शिवसेना-भाजप युती नव्हती. त्यामुळे मोदीलाटेत पवार निवडून आले. आता युती होण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेने कल्याण पश्चिमेवर दावा ठोकला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना