शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापौर कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:40 IST

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघ, तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघ, तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघांनी विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या वतीने रविवारी विजेत्या पुरुष व महिला संघांना प्रत्येकी एक लाख रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले गेले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी उपस्थित होते.

पुरुष गटात एअर इंडिया द्वितीयव्यावसायिक पुरुष संघात द्वितीय पारितोषिक एअर इंडियाने पटकाविले असून त्यांना रोख रक्क्म ७५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. उपउपान्त्यपद महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, भारत पेट्रोलियमने पटकाविले असून त्यांना रोख रककम ३० हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. एअर इंडिया संघातील उमेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघातील बाजीराव घोडके यांनी उत्कृष्ट पकड, तर उदयोन्मुख खेळाडू किताब ठाणे पालिका संघातील अक्षय भोईर, तर मालिकावीरमधील उत्कृष्ट खेळाडूची रोख रक्कम २१ हजाराचे पारितोषिक महाराष्ट्र पोलीस संघाच्या नितीन थळेनी पटकाविली.महिला गटात बँक आॅफ बडोदा महिला व्यावसायिक गटात द्वितीय पारितोषिक बँक आॅफ बडोदा यांनी पटकाविले असून त्यांना रोख रक्कम ७५ हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्यपद एमरल्ड द इन्फ्रास्ट्रक्चर व बालवडकर पाटील व्हेंचर्स यांनी पटकाविले असून त्यांना रोख रककम ३० हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक बँक आॅफ बडोदाच्या साक्षी रहाटे, उदयोन्मुख खेळाडूचा किताब लेयर टेक्नॉलॉजी संघातील ज्योती पवार यांनी, तर उत्कृष्ट खेळाडूची रोख रक्कम २१ हजाराचे पारितोषिक ठाणे पालिका संघातील कोमल देवकरने पटकाविले.

ठाणे पालिकेच्या महिला संघाने प्रथमच स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद पटकावल्याने या संघाला महापौर नरेश म्हस्के यांनी २५ हजारांचे, उपमहापौर पल्लवी कदम यांनी ११ हजारांचे तर सभागृह नेते अशोक वैती व शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी संयुक्तरीत्या २१ हजारांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले.मुंबईतही थरारठाणे पालिकेने नियोजनपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांचे कौतुक करून अशा प्रकारची स्पर्धा मुंबईतदेखील आयोजित करणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Kabaddiकबड्डी