शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मतदानाच्या दिवशी घराेघरी प्रतिनधी पाठवून मतदानाची टक्केवारी वाढवा - एस.चोक्कलिंगम

By सुरेश लोखंडे | Updated: May 17, 2024 20:19 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देश प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंग यांनी दिले.

- सुरेश लोखंडे ठाणे -  जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देश प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंग यांनी दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी चोक्कलिंगम ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात निवडणुकीशी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम, सर्व नोडल अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पादर्शक व निर्भिड वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी एकत्रित काम करावे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांना घरोघरी पाठवून नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शहरी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी त्या सोसायट्यांच्या सचिव व अध्यक्षांची मदत घ्यावी. त्यासाठी सचिव व अध्यक्षांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) म्हणून घोषित करावे. शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत पालकांपर्यंत संदेश पोहचवावा, असेही चोक्कलिंगम यांनी मार्गदर्शन केले.

माथाडी कामगार, विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी यांनी मतदान करावे, यासाठी संबंधित उद्योग/संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच कामगार संघटनांशी संपर्क साधून आवाहन करावे. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा द्यावी. तसेच मतदान केंद्रांची जागा सुलभपणे सापडण्यासाठी क्यूआर कोड, गुगल मॅपचा वापर करून माहिती द्यावी. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आचारसंहिता भंगाविरुद्ध गुन्हे दाखल करा. कोणत्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. चुकीची माहिती प्रसारित होत असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे, 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thane-pcठाणे