शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाल विज्ञान परिषदेत महाराष्ट्र चमकला, तीन प्रकल्प टॉपरच्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:40 IST

अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे.

ठाणे : अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २५ वी परिषद आहे. २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान अहमदाबाद येथे ही राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत महाराष्ट्रातील ३०, तर ठाणे जिल्ह्यातील ४ प्रकल्प सादर झाले होेते. त्यातील तीन प्रकल्पांची टॉप १५ मध्ये निवड झाली आहे. त्या तीन प्रकल्पांमध्ये मुंबईच्या पार्ले येथील मूकध्वनी विद्यालयाच्या नेहा शेख यांचा ‘कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर एक्सटेंडिंग लाइफ आॅफ हिअरिंग एड’ हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प हिंदीमध्ये होता. ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या तेजस्विनी देशमुख यांचा ‘इम्पॅक्ट आॅफ वेहिक्युलर पल्युशन आॅफ ट्रॅफिक पोलीस’ हा प्रकल्प इंग्रजीमध्ये असून तो निवडला आहे. तिसरा प्रकल्प हा कोल्हापूरच्या श्री. एस.एच.पी. हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या मधुबाला मगदूम यांचा ‘टू स्टडी द इफेक्ट आॅफ अझोला आॅन प्रॉडक्शन आॅफ काउस मिल्क’ हा असून तो मराठीमध्ये मांडला आहे. या प्रकल्पांना जिज्ञासा ट्रस्टने मार्गदर्शन केले होते. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था महाराष्टÑात विज्ञान परिषदेची समन्वयक संस्था म्हणून काम करते. रविवारी परिषदेच्या शेवटच्या दिवशी निवडक प्रकल्पांची नावे जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Sportsक्रीडा