शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका डायरी: 'आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या'ने टीएमटीची दुर्दशा

By अजित मांडके | Updated: March 10, 2025 11:08 IST

ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) गाडा गाळातच रुतलेला आहे. टीएमटीला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता ...

ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) गाडा गाळातच रुतलेला आहे. टीएमटीला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता आलेला नाही. परिवहनचे महिन्याचे उत्पन्न आठ कोटींच्या आसपास असून खर्च १६ कोटींच्या वर आहे. परिवहनचा गाडा हा महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या कुबड्यांवरच सुरू आहे. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत ६०० बसगाड्यांची आवश्यकता असताना आजमितीला परिवहनच्या ३८५ च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत.

टीएमटी सेवा १९८९ मध्ये सुरू झाली. एक लाख लोकसंख्येमागे ३० बस असे गणित आहे. मात्र आज शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात असताना परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या त्या प्रमाणात वाढू शकलेली नाही. परिवहनच्या ताफ्यातील ४५४ बसपैकी ३८० ते ३८५ बस रस्त्यांवर धावत असतात. त्यात १२३ इलेक्ट्रिक बस तर ३५ सीएनजी बस आहेत. यातील २४० बस जीसीसी तत्त्वावर खासगी ठेकेदाराकडून चालवल्या जात आहेत. नव्याने दाखल झालेल्या १२३ इलेक्ट्रिक बसदेखील खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जात आहेत. परिवहनच्या ताफ्यात स्वतःच्या जमतेम ८४ च्या आसपास बस आहेत. यातील २५ ते ३० बस आजही दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत. तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या ३० व्होल्वो बसपैकी जेमतेम ८ ते १० बस रस्त्यांवर धावत असल्याचे विदारक चित्र आहे. परिवहनच्या स्वतःच्या बस रस्त्यावर धावत नसल्याने परिवहनचे पगारी चालक, वाहक आगारात तासन्तास बसून असतात. काही कर्मचाऱ्यांना टीसी बनवले, तर काहींना वागळे आगारात काम देण्यात आले.

२६० बस नव्याने दाखल होणार 

परिवहनच्या ताफ्यात पीएमई योजनेंतर्गत १०० आणि १५ व्या वित्त आयोगातून १६० बस उपलब्ध होणार आहेत. येत्या वर्षभरात १०० बस उपलब्ध होतील. १० डबलडेकर बस सेवेत दाखल करण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेवर भिस्त 

परिवहनच्या बसमधून रोजच्या रोज अडीच ते पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. परिवहनला रोजच्या रोज २६ ते २७ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. महिन्याकाठी परिवहनच्या तिजोरीत आठ कोटी जमा होतात. कर्मचाऱ्यांचा पगार, सीएनजी आणि इतर खर्च हा १५ ते १६ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे परिवहन दरवर्षी ठाणे महापालिकेकडे जास्तीत जास्त अनुदानाची मागणी करते. महापालिकेच्या अनुदानामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार व परिचालन खर्च केला जातो. महापालिका आर्थिक संकटात असल्याने अनुदान कमी प्राप्त झाले तर गणिते जुळवताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागते.

कर्मचाऱ्यांची ३५० कोटींची देणी 

ठाणे परिवहन सेवेत कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ३५० कोटींची देणी परिवहनला द्यायची आहेत. यात सहाव्या, सातव्या वेतन आयोगांसह पीएफ व इतर देण्यांचा समावेश आहे. ही देणी २०११-१२ पासून थकीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका