शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

‘मॅजिक बकेट’ कर्मचारी, नगरसेवकांना पुरविणार

By admin | Updated: March 1, 2016 02:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचा प्रश्न न्यायालयात गाजत असताना, त्याच वेळी स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात ‘अस्वच्छ शहर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचा प्रश्न न्यायालयात गाजत असताना, त्याच वेळी स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात ‘अस्वच्छ शहर’ असा शिक्का बसलेल्या कल्याण-डोंबिवलीचा हा लौकिक पुसून टाकण्यासाठी ‘मॅजिक बकेट’ अर्थात ‘कचरा खाणाऱ्या जादूच्या बादलीचा’ प्रयोग केडीएमसी राबविणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारच्य्या महासभेत दिली.१०० शहरांच्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या यादीत महापालिकेचा ६४ क्रमांक आला. त्यामुळे शहर अस्वच्छ असल्याचे चित्र सर्वत्र उभे ठाकले. या मुद्यावर विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती. त्यावर, मनसेचे सदस्य मंदार हळबे, शिवसेना सदस्य श्रेयस समेळ व मोहन उगले यांनी प्रश्न उपस्थित करून उपायुक्त सुरेश पवार यांना धारेवर धरले. उपायुक्त पवार यांना त्यावर योग्य प्रकारे उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर, हस्तक्षेप करत आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले, कचरा गोळा करण्याची पद्धत काय आहे, त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते, कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गोळा केला जातो का, या निकषांच्या आधारे केंद्र सरकारच्या समितीने पाहणी करून हा अहवाल तयार केला. त्यातील दोन हजार मार्कांपैकी कल्याण-डोंबिवली महापालिकेस स्वच्छतेच्या बाबतीत ८९८ मार्क मिळाले. आयुक्तांच्या निवेदनापश्चात महापौर देवळेकर यांनी सांगितले, आपल्याकडे ओला आणि सुका कचरा एकत्रित गोळा केला जातो. ओल्या कचऱ्यावर घरच्याघरी प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केले जाऊ शकते. त्यासाठी ‘मॅजिक बकेट’ मिळते. ही बकेट १२५ नगरसेवकांना दिली जाणार आहे. तसेच महापालिकेचे दोन हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही बकेट दिली जाणार आहे. बकेटची किंमत ५०० रुपये आहे. ही रक्कम नगरसेवकांच्या मानधनातून व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापली जाणार आहे. स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून करण्याची सवय त्यांना लावली जाणार आहे. त्याचबरोबर दोन हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या नव्या इमारतीत बायोगॅसचा प्लांट उभारण्याची सक्ती असेल. अन्यथा, नव्या इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी मनपाने सौरऊर्जा व वर्षा जलसंचयनासाठी अशीच सक्ती केली होती. मात्र, बिल्डर केवळ परवाने मिळवण्यापुरता देखावा करतात. त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जाते की नाही, हे प्रत्यक्ष जाऊन पहावे लागेल.