शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी ग्रंथ संग्रहालय व राज्य मराठी विकास संस्थेच्या "रसग्रहण" स्पर्धेत माधुरी बागडे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:13 IST

मराठी ग्रंथ संग्रहालय व राज्य मराठी विकास संस्थेच्या "रसग्रहण" स्पर्धेत माधुरी बागडे प्रथम क्रमांक पटकावला. 

ठळक मुद्दे"रसग्रहण" स्पर्धेत माधुरी बागडे प्रथमसीमा जोशी यांनी दुसरा क्रमांक, तर प्रतीक्षा बोर्डे यांनी तिसरा क्रमांक "वाचन प्रेरणा दिन" साजरा

ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी "वाचन प्रेरणा दिना" निमित्त घेतलेल्या आवडलेल्या पुस्तकांवर "रसग्रहण" लिहिण्याच्या स्पर्धेत माधुरी बागडे या प्रथम आल्या आहेत, तर सीमा जोशी यांनी दुसरा क्रमांक, तर प्रतीक्षा बोर्डे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त १५ ऑक्टोंबर हा दिन दरवर्षी "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी संयुक्तपणे "वाचन प्रेरणा दिन" साजरा केला. या निमित्ताने आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला वाचकांनी उत्स्फ़ूर्त प्रतिसाद दिला, या स्पर्धेत अरूण शेवते यांच्या "एकच मुलगी" या पुस्तकाच अप्रतिम रसग्रहण माधुरी बागडे यांनी केले होते, त्यांनी रसग्रहण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या "शहाण्या माणसांचा सायकिअँट्रिस्ट" या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण रसग्रहण सीमा जोशी यांनी केले होते, त्यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. तर कवी महेंद्र कोंडे यांच्या "बावनकशी" या कवितासंग्रहाचं रसभरीत रसग्रहण केल्याप्रकरणी प्रतीक्षा बोर्डे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. शरदचंद्र घाटे, अनुराधा मेहेंदळे, विनिता आगाशे, रमेश भुरे, सुरेंद्र पाटील यांनाही या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे, धनश्री करमरकर व महेश शानभाग या कला-साहित्य क्षेत्रातील धुरिणांनी अमृता प्रीतम, सआदत हसन मंटो व प्रतिभा राय या जगप्रसिध्द साहित्यकांच्या अजरामर कथांचे अभिवाचन केले. अमृता प्रीतम यांच्या "सोलवॉ साल" या संवेदनशील कथेचे प्रतिभा राय यांच्या "चंद्रभागा आणि चंद्रकला", या जगात न संपणारी दु:ख आहेत हा संदेश देणार्‍या कथेचं आणि सआदत हसन मंटो यांच्या फ़ाळणीतील "हिंदु-मुस्लिम सैनिकांची व्यथा" मांडणारी "शेवटचा सलाम" कथा आणि "लायसन्स" या अब्बू-नीतीचे प्रेम व्यक्त करणार्‍या कथेच अभिवाचन सादर केले. रसिक प्रेक्षकांनी या अभिवाचनाला उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या निवडणुकीतील कामगिरीबाबत सदाशिव जोशी, निशिकांत महांकाळ आणि मोहन देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. रसग्रहण स्पर्धेचे परीक्षण सीमा दामले व आशा जोशी यांनी केले. यावेळी बोलताना मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी वाचक व ग्रंथालय पुस्तकरूपी सहभागासाठी "ग्रंथगंगा" या अभिनव योजनेची घोषणा केली. सर्व मान्यवरांचे स्वागत मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यवाह अनिल ठाणेकर यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यकारीणी मंडळ सदस्य दुर्गेश आकेरकर यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामlibraryवाचनालय