लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार गावाच्या हद्दीत उभा असलेल्या नादुरु स्त ट्रेलरला मागून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने चालकासह दोन जागीच ठार झाले तर १६ प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात व आस्था हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. नादुरु स्त ट्रेलर वेळीच रस्त्यावरून सुरक्षित जागी वाहतूक पोलीस व आय आर बी कंपनीने हलविला असता तर हा अपघात झाला नसता. तसेच या दोन प्रवाशांचे प्राणही वाचले असते. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिलहर गावाचे हद्दीत असलेल्या उड्डाणपुलावर मुंबई वाहिनीवर ना दुरु स्त अवस्थेंत एक भला मोठा ट्रेलर उभा होता त्याच दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरीच्या चालकास रस्त्यावर ट्रेलर उभा आहे याचा अंदाज न आल्याने ती त्यावर धडकली. त्यामध्ये शैलेश कुमार मेजराम राजपूत वय ४० रा खोकरा अहमदाबाद व डेनिस अरविंद सुदानी वय १६ रा राजकोट हे जागीच ठार झाले. सावंत विपुल भाई जोटगीय वय १६ , मंजुळाबेन कपाडिया वय ५५, हितेश पदासिया , बेला कपाडिया वय २६, पिरितबेन गुबावत वय ४३ अशोक बाळू रावल आदी १६ प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या आहेत मनोर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली असून अधिक तपास पो उप नि सोनावणे करीत आहेत
लक्झरीची ट्रेलरला धडक, दोन ठार
By admin | Updated: May 9, 2017 00:21 IST