शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ८५ वर्षांपुढील मतदारांसह दिव्यांगांकडून गृहमतदानास अल्प प्रतिसाद

By सुरेश लोखंडे | Updated: May 10, 2024 20:52 IST

फक्त ३०० जणांचे मतदान.

 ठाणे : यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यापैकी ८५ वर्षे व त्या पुढील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या गृहमतदानाला गुरूवारपासून ठाणे लाेकसभा मतदारसंघात सुरूवात झाली. या मतदारसंघात २७ हजार ३२५ जेष्ठ नागरिक मतदार आहे. पण त्यापैकी अवघ्या २६२ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे. तर एक हजार ९५२ दिव्यांगांपैकी फक्त ३८ मतदारांनी गृहमतदान केले आहे. त्यामुळे गृहमतदानाची संधी असूनही जेष्ठ नागरिक व दिव्यांगांकडून त्यास फारसा प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे.

या गृहमतदानाला प्रारंभ हाेताच पहिल्या दिवशी सायंकाळपर्यत ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २६२ नागरिकांनी तर ३८ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली. तसे या लाेकसभा मतदारसंघात ८५ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- १५ हजार २१ , महिला मतदारांची संख्या १२ हजार ३०४ इतकी आहे. तर ४० टक्के अपंगत्व व ८५ वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा निवडणूक आयाेगाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या जेष्ठ इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूकची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे हा १२ डी फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी आज टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभानिहाय जेष्ठांचे गृहमतदान -

या ठाणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात आज या जेष्ठ नागरिकांनी व दिव्यांगांनी मिळून ३०० जणांनी गृहमतदान केले. त्यापैकी मिरा-भाईंदर ३४ जेष्ठ मतदार व तीन दिव्यांगांनी गृहमतदान केले. याप्रमाणेच ओवळा माजिवडा ४६ जेष्ठांचे तर १६ दिव्यांगांचे गृहमतदान झाले. काेपरी पाचपाखाडीत २२ जेष्ठ आणि चार दिव्यांग, ठाण्यात १०३ जेष्ठ आणि दाेन दिव्यांग तर ऐरोलीत १८ जेष्ठ मतदार आणि चार दिव्यांगांनी मतदान केले. याप्रमाणेच बेलापूरला ३९ जेष्ठांनी आणि नऊ दिव्यांगांनी गृहमतदान केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे