शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

एक सच्चा कार्यकर्ता गमावला - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:07 IST

राजेंद्र देवळेकर यांना वाहिली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीचे माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच समाजातील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.‘राजेंद्र देवळेकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. धडाडीचे शिवसैनिक, अशी ओळख असणारे देवळेकर या कोरोनाकाळातही अनेकांच्या मदतीला धावून गेले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास वाटचालीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता, मनमिळाऊ लोकप्रतिनिधी गमावला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेवळेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील नेते व नगरसेवक राजेंद्र देवळेकर हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सामाजिक कार्याला वाहून घेतलेले कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्त्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना त्यांची उणीव सतत जाणवेल. या दु:खातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना व सहकारी कार्यकर्त्यांना मिळो, ही प्रार्थना.- अजित पवार,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

के डीएमसीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या निधनामुळे कल्याणमधील शिवसेना परिवारात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेकरिता सदैव तत्पर, सुस्वभावी, मनमिळाऊ देवळेकर आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. तसेच देवळेकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो.- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे

राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ तसेच मदतीसाठी तत्पर असलेल्या देवळेकर यांच्या जाण्याने शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवली विभागाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली. - डॉ. श्रीकांत शिंदे,खासदार कल्याण लोकसभामहापालिका कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले, चांगले व्यक्तिमत्त्व देवळेकरांच्या निधनाने आपण गमावले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना देवळेकर हे एक चांगले प्रशासक असल्याचेही त्यांच्या कामातून पाहायला मिळाले. १९९५ पासून नगरसेवक असलेल्या देवळेकरांचे काम महापालिका सचिव म्हणून जवळून पाहता आणि अनुभवता आले. - चंद्रकांत माने, माजी सचिवदेवळेकर केडीएमसीचे ज्येष्ठ सदस्य राहिले. अभ्यासू आणि कर्तृत्ववान असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अडीच वर्षांची महापौरपदाची कारकीर्दही त्यांनी यशस्वीरीत्या निभावली होती. त्यांच्या निधनाने शिवसेना पक्षाची हानी झाली आहेच. त्याचबरोबर महापालिकेचेही नुकसान झाले आहे.- विनीता राणे, महापौर, केडीएमसी

सभापतीपद आणि महापौरपद भूषविताना देवळेकरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना समान न्याय दिला होता. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सभागृहात चर्चेच्या वेळी याची प्रचीती वारंवार यायची. असा लोकप्रतिनिधी पुन्हा होणे नाही.- नंदू म्हात्रे, काँग्रेस, माजी गटनेते, केडीएमसीमाजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती, अशी महत्त्वाची पदे भूषवलेले माझे मित्र, कट्टर शिवसैनिक व अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणजे राजेंद्र देवळेकर. समोरासमोर भेटले तर सुहास्यवदने आणि मृदू भाषेत बोलणारे देवळेकर महापालिकेच्या सभागृहात आक्रमक शैलीत अभ्यासपूर्ण विवेचन करून प्रशासनाची पोलखोल करत. केडीएमसीतील विशेषत: कल्याणच्या नागरी समस्यांचा जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. महापौरपदाच्या माध्यमातून कल्याणच्या विकासासाठी आपली कटिबद्धता जपली, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्यच म्हणावे लागेल.- रवींद्र चव्हाण,आमदार, डोंबिवली

राजकारणापलीकडे जाऊन मैत्रीसंबंध जोपासणारे, मनमिळाऊ, लाडके असे व्यक्तिमत्त्व राजेंद्र देवळेकर आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेकरिता सदैव ते तत्पर असायचे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसेच देवळेकर कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो.- प्रमोद पाटील, आमदार

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना