शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली पैशांची बॅग सापडली; रेल्वे, पोलिसांची तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:41 IST

आईच्या उपचाराचे पैसे मिळाले परत

ठाणे : आजारी असलेल्या आईच्या उपचारासाठी नाशिक येथील नातेवाइकांकडून आणलेले ६६ हजार ५०० रुपये ज्या बॅगेत ठेवले होते, तीच बॅग लोकलमध्ये राहिल्याने रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील रहिवासी माधवी रमेश सोष्टे (३५) यांच्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली होती. मात्र, रेल्वे प्रशासन आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत बॅग पैशांसह परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. माधवी यांनी रेल्वे प्रशासन आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.सोष्टे या नाशिकहून रविवारी दुपारच्या सुमारास एक्स्प्रेसने ठाण्यात उतरल्या. त्यानंतर, त्या ठाण्यातून पनवेल येथे जाण्यासाठी ठाणे-नेरूळ लोकलमध्ये बसल्या. यावेळी त्यांच्या दोन बॅगा असल्याने त्यांनी एक बॅग लोकलमधील रॅकवर ठेवली. नेरूळ आल्यावर सोष्टे या घाईगडबडीत एक बॅग घेऊन उतरल्या आणि एक बॅग लोकलमध्येच राहिली. त्यानंतर, ती लोकल पुन्हा ठाण्याकडे रवाना झाली. थोड्या वेळानंतर त्यांना एक बॅग लोकलमध्ये राहिल्याचे लक्षात येताच, त्यांनी रेल्वेच्या कंट्रोलमध्ये तक्रार केली. कंट्रोल रूमकडून त्याबाबत ठाणे लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस नाईक मोहन जाधव आणि पोलीस शिपाई प्रभाकर नाटेकर हे दोघे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना माहिती मिळताच, त्यांनी तातडीने धाव घेत, ती लोकल आल्यावर त्या डब्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना लोकलमध्ये बॅग आढळून आली. सोष्टे यांना पोलिसांनी रेल्वेस्थानकात बोलवले. सोष्टे यांना शांत राहण्यास सांगून पिण्यास पाणी दिले.त्यांनी बॅगेची खातरजमा करून ती बॅग त्यांच्या स्वाधीन केली. त्या बॅगेत त्यांनी नाशिक येथील नातेवाइकांकडून आईच्या औषधोपचारासाठी आणलेले ६६ हजार ५०० रुपये, औषधे, आधारकार्ड, एटीएमकार्ड, हॉस्पिटलची महत्त्वाची कागदपत्रे होती.