शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:11 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे-

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली. मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत परखड मत व्यक्त केलं. 

धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींमुळेच देशाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. तसंच माणूस आजही 'हंटर'च आहे. आजही तर सेकंदाला बलात्कार होतात, खून होतात आणि आरोपी अनेक वर्ष सापडत नाहीत. हेच आपले 'अच्छे दिन' आहेत, असंही नेमाडे पुढे म्हणाले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेवर नेमकं काय बोलले नेमाडे?"जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हिच आहे. मी पाकिस्तानात, चीनमध्येही गेलोय. तिथंही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मुल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिलीय. चीनमध्येही महिलांना आपल्या साडीचं अप्रूप असतं. सगळी चांगली लोक आहेत. सरकार वाईट असतात. राष्ट्र वाईट असतं. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांच्या त्याच्या पलिकडे जाऊन लिहावं, असंही ते पुढे म्हणाले. 

'अच्छे दिन' काय तेही सांगितलं..."माणूस अजूनही हंटर वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर दोन-तीन मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्ष आरोपी सापडत नाहीत. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात. अशावेळी लेखकांचं काम असतं की सर्वांना चांगलं बोलणं किंवा वरवरचं वागू नये. परखडपणे मत मांडावं", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

आपल्या मनात जे येतं ते खरं असतं कारण आपल्या नेणीवांमध्ये ते येत असतं. फक्त आपल्याला चौकट बरोबर सांभाळावी लागते. कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चौकटीत लिहिणं बरेचदा दुर्देवानं मला जमत नाही. त्यामुळेच गेली पाच वर्ष मी पोलीस सुरक्षेखाली आहे. ही खरंतर वाईट परिस्थिती आहे. 'अच्छे दिन' यालाच म्हणतात असं मी मानतो, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.