शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमधील ग्राहकांची केबलचालकांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:13 IST

जोडणीसाठीही घेतात पैसे; चॅनल निवडण्याच्या अर्जांची सर्रास विक्री

बदलापूर : बदलापूरमध्ये केबलचालकांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर ग्राहकांना पसंतीचे चॅनल निवडण्याचे जे अधिकार दिले आहेत, त्याची माहिती केबलचालकांनी ग्राहकांना देणे गरजेचे आहे. मात्र, बदलापूरमधील काही केबलचालकांनी पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी जो अर्ज तयार केला आहे, तो अर्ज विकण्याचे आणि अर्ज भरून देण्यासाठी पैसे उकळण्याचे काम सुरू केले आहे.ज्या ग्राहकांनी अर्ज केलेले नाहीत, त्यांची केबलजोडणी तोडण्याचे प्रकार सुरू केले आहेत. जोडणी तोडल्यानंतर अर्ज केलेल्या ग्राहकाला पुन्हा केबलजोडणीसाठी सरसकट १५० ते २०० रुपये आकारत आहेत. सध्या बदलापूरमध्ये केबलचालकांविरोधात संताप पसरला आहे. येथील केबलचालकांनी ग्राहकांच्या हक्कावरच गदा आणण्याचे काम सुरू केले आहे. ग्राहकांकडून पसंतीच्या चॅनलचा पॅक घेण्यासाठी जो अर्ज भरण्याची सक्ती केली आहे, त्या सक्तीचा गैरवापर सुरू करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील केबलचालकांनी अर्ज विकत देण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर अर्ज भरून घेण्यासाठी ५० रुपये स्वतंत्र आकारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अनेक ग्राहकांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांची केबलजोडणी काढण्याचा प्रकार पुढे येत आहे. त्यातही केबलचालकांनी आपला खिसा भरण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाची केबलजोडणी बंद केल्यावर तो ग्राहक लागलीच अर्ज भरत असल्याने अर्ज भरण्याचे आणि सोबत पुन्हा केबलजोडणी सुरू करण्याचे १५० ते २०० रुपये आकारण्याचे काम सुरू केले आहे. केबलचालकांच्या या दादागिरीची तक्रार नेमकी कुणाकडे करावी, हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. बदलापूरमधील बहुसंख्य केबलचालकांनी हा प्रकार केल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.बदलत्या नियमांची माहिती देऊन ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही केबल व्यावसायिकांची आहे. मात्र, बदलापूरमधील केबलचालकांनी ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात अतिरिक्त पैसे लाटणाऱ्या केबलचालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्राहक करत आहेत.तक्रार आल्यास कारवाई करूमनोरंजनकर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत या केबलचालकांवर नियंत्रण केले जाते. मात्र, तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नसल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन