शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यकर्मींकडून ध्वनी व्यवस्थेसाठी लूट, पावती न देताच सरसकट ३८०० रुपयांची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:11 IST

डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. राज्यात अन्यत्र कुठेही असे शुल्क आकारते जात नसल्याने ते परत देण्याची मागणी नाट्यकर्मी आणि सहभागी संस्थांनी केली आहे.नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.ही प्राथमिक स्पर्धा असून ती २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यात २५ नाटके सादर होतील. मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी चौकशी केली असता नाट्यगृह ध्वनी व्यवस्थेसाठी पैसे आकारत नाही, हे स्पष्ट झाले. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाकडून फक्त प्रकाशयोजना पुरवली जाते. पण साऊंड सिस्टीम अर्थात ध्वनी योजनेसाठी तीन हजार आणि स्टेजवरील ध्वनी व्यवस्थेसाठी आठशे रुपये आकारले जातात.नाट्यकर्मी बापू राऊत यांनी अशी वसुली होत असल्याचे मान्य केले. आतापर्यंत दहा संस्थांनी प्रयोग सादर केल्याने ३८ हजार रूपये गोळा झाले आहेत. पुढील काळात १५ नाट्यसंस्था २४ डिसेंबरपर्यंत प्रयोग सादर करतील. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क आकारू नये आणि आधीच्या संस्थांकडून गोळा केलेले पैसे परत करावेत, अशी मागणी या संस्थांची आहे.रंगकर्मी मनोहर सुर्वे यांनी सांगितले, अनेक ठिकाणी स्पर्धा होतात. तेथे पैसे घेतले जात नाहीत. ते घेणार असल्याची पूर्वकल्पना असल्यास संस्था त्या तयारीने येते. आयत्यावेळी पैसे वसूल केल्याने स्पर्धेत सहभागी होणाºया संस्थांच्या प्रयोगावर वाईट परिणाम होतो.सरकारतर्फे समन्वयाचे काम पाहणारे सुधीर रोकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, प्रत्येक नाट्यगृहाचे नियम वेगळे असू शकतात. पण संस्थांनी पैसे दिले असल्यास त्यांनी पावती घ्यावी. नाट्यगृहाने पैसे आकारल्याची तक्रार अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे माझा काही संबंध नाही, असे सांगून रोकडे यांनी हात वर केले.फुले नाट्यगृहाचा नियम पुढे करून ही पैसेवसुली बिनबोभाट सुरू आहे. पण या रकमेची कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे हा पैसा जातो कुठे? तो कशासाठी घेतला जात आहे, असा सवाल नाट्यकर्मींसह नाट्यसंस्थाकडून केला जात आहे. नाट्यगृहात मिक्सरसह लॅपटॉप आॅडिओ कनेक्शन दिले जात नाही. त्याचा रंगकर्मींच्या सादरीकरणावर परिणाम होतो. तालमीवर पाणी पडते. तांत्रिक बाबीची पूर्तता करणे ही आयोजकांची पर्यायाने सरकारची जबाबदारी आह, असे रंगकर्मींचे म्हणणे आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली