शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हालचालींवर नजर

By admin | Updated: January 3, 2017 05:41 IST

ठाणे महापालिका मुख्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली असून महापौर आणि आयुक्तांच्या दालनात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘आयपी’ व्हायरल झाल्याने त्यांच्या हालचाली कुणालाही

ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली असून महापौर आणि आयुक्तांच्या दालनात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘आयपी’ व्हायरल झाल्याने त्यांच्या हालचाली कुणालाही आपल्या मोबाईलवर पाहणे सहज शक्य झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशाच पद्धतीचे आयपी बेस १०० कॅमेरे महापालिका मुख्यालयात बसवण्यात येणार असल्याने महापालिकेत चोऱ्यामाऱ्या करण्यापासून घातपाती कारवाया घडवून आणणे सहज शक्य होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या सदस्याने सोमवारी याबाबतचा गौप्यस्फोट केला. कॅमेराचा आयपी व्हायरल झाल्याने एखादे दहशवादी कृत्यही यातून होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्थायीची सभा सुरु होताच, सदस्य बालाजी काकडे यांनी नगरसेवक निधीतून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार होते. ते अद्याप का बसविण्यात आलेले नाहीत, असा सवाल उपस्थित केला. याच मुद्याला धरुन कॉंग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी सीसीटीव्हीचे काही दुष्परिणाम सभागृहासमोर उघड केले. महापालिका मुख्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आयपी व्हायरल झाला असून आज अनेकांच्या मोबाइलमध्ये या कॅमेऱ्यांतील दृष्य दिसत आहेत. आयुक्त आणि महापौरांची गाडी किती वाजता आली, ते दालनात काय करतात यासह इतर सर्वच माहिती अनेकांच्या मोबाइलवर दिसत आहे. या बाबत पालिका प्रशासनाला माहित आहे का? असा सवालही त्यांनी केला. परंतु याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक असे उत्तर मिळाले नाही. शिंदे यांच्या आरोपानंतर या कॅमेऱ्यांचा आयपी आणि पासवर्ड बदलण्यात आल्याची माहिती पालिकेतल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. येत्या काळात पालिका मुख्यालयात २४ लाख खर्च करून १०० आयपी बेस सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून त्याचे टेंडर नुकतेच उघडण्यात आले आहेत. सध्या बसवलेल्या कॅमेऱ्यांचे आयपी आणि पासवर्ड सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असतील तर भविष्यातही त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची शाश्वती देता येत नसल्याने या सीसीटीव्हींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, नगरसेवक निधीतून बसवण्यात येत असलेल्या कॅमेऱ्यांना कायदेशीर बाबीतून जावे लागते. परंतु एखाद्या आमदाराने अथवा नगरसेवकाने ठरवले तर तत्काळ त्याच्या भागात कॅमेरे लावले जातात, विशेष म्हणजे अशा पध्दतीने लावण्यात येत असलेल्या खाजगी कॅमेऱ्यांवर नियंत्रण कोणाचे असते पालिकेकडून त्यांनी परवानगी घेतलेली आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी प्रशासनावर केली. या खाजगी कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग पोलीस स्टेशनमध्ये होणे अपेक्षित असतांना काही राजकीय मंडळींनी आपल्या केबिनमध्ये त्याचे मॉनिटरिंग ठेवले आहे, भविष्यात याचे वाईट परिणाम होऊ शकतात असा इशाराही सदस्यांनी दिला. परंतु सर्व प्रश्नांची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. (प्रतिनिधी)