शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लांबच्या मार्गावर पूर्वीच्याच ३२ आसनी लोकल धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:49 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर काही लोकलमध्ये केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत. त्याची मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेत, लांबच्या मार्गावर कमी आसनाच्या लोकल न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे डिआरएम एस.के.जैन यांचा प्रवासी संघटनेला दिलासाकमी आसनाच्या लोकल शॉर्टरुटवर

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर काही लोकलमध्ये केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत. त्याची मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेत, लांबच्या मार्गावर कमी आसनाच्या लोकल न सोडण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या प्रतिनिधींनी जैन यांची गुरुवारी मुंबई येथे अ‍ॅनेक्स इमारतीत डिआरएमच्या दालनात भेट घेतली. त्या भेटीमध्ये जैन यांनी प्रवाशांची अपेक्षा समजावून घेत, त्या मागणीत तथ्य असल्याचे म्हंटले. दोन तासांहून अधिक वेळ लागणा-या कसारा, कर्जतच्या प्रवाशांना कमी आसनाच्या लोकल सुविधा काही उपयोगाची नाही, त्यात प्रवाशांची अडचणच होते. त्यामुळे शॉर्ट रुटच्या लोकलमध्ये ही सुविधा द्यावी, हे बदल तातडीने करावे असे आदेश त्यांनी परिचालन विभागाच्या अधिका-यांना दिले.सध्याच्या कमी आसन असलेल्या काही लोकलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन लांब पल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीच्या स्थानकापासुनच ठाणे कल्याण पुढील रेल्वे स्थानकापर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागतोे. आसनावर बसलेल्या कुणी सहप्रवासीही लांबचा प्रवास असल्याने सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देत नसल्याचा अनुभव येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये आभावानेच प्रवासी घाटकोपर,ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी लोकमतकडे व्यक्त केली होती.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेdombivaliडोंबिवलीRailway Passengerरेल्वे प्रवासी