शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

लाँग वीकएण्ड होणार ठंडा ठंडा, कूल कूल! वातावरण होणार गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:23 IST

यंदा म्हणावी तशी थंडी जाणवलीच नाही, अशी प्रतिक्रिया देणा-या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना येत्या आठवड्यात मस्त गारेगार वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे : यंदा म्हणावी तशी थंडी जाणवलीच नाही, अशी प्रतिक्रिया देणा-या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना येत्या आठवड्यात मस्त गारेगार वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणा-या लाँग वीकएण्डला वाढत्या थंडीची सुखद जोड मिळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुट्या, त्याला जोडून होणा-या सहली अधिक आल्हाददायी, गुलाबी होण्याची चिन्हे आहेत.माघ महिन्यात मस्त थंडी पडते, असा नेहमीचा अनुभव असला; तरी गेल्या पंधरवड्यात थंडी टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. दुपारी तर घाम फुटावा, इतका उष्मा जाणवत होता. मात्र गेल्या तीन दिवसांत थंडीने पुन्हा गारेगार अनुभव देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक घरांतील एसी बंद झाले. उबदार अंथरूणे, स्वेटर, शाली-मफलर, लोकरीचे स्कार्फ, कानटोप्या, ग्लोव्हज् अशी सारी थंडीची आयुधे अंग झटकून बाहेर आली. लोकलच्या खिडक्या-पंखे पहाटे-रात्री बंद होऊ लागले. मुंबई-ठाणेकरांना गुलाबी वाटावी इतपत थंडी जाणवू लागल्याने ती परतल्याचा अनुभव येऊ लागला. सोबतच गार वाºयांनी थंडीचा कडाका वाढवत नेला.लाँग वीकएण्डनिमित्त बाहेर जाण्याचे प्लॅन करणाºयांना, प्रवास करणाºयांना थंडीने चांगलाच दिलासा दिला. सध्याच्या आल्हाददायी वातावरणामुळे त्यांच्या फिरण्याचा आनंद द्विगुणित होणार असे वाटत असतानाच हवामान खात्याने थंडी वाढत जाईल, असे सांगत सुखद दिलासा दिला. शुक्रवारपासून थंडी वाढत जाईल आणि सध्या १९ ते २१ अंशांदरम्यान असलेले तापमान एक ते दोन अंशांनी घटेल, असा सध्याचा अंदाज आहे. पुढील संपूर्ण आठवडा थंडीचा मुक्काम असेल. त्यात रविवारचे रात्रीचे तापमान घसरून १७ अंशांपर्यंत खाली जाईल, असा ठोकताळा मांडण्यात आला आहे. आठवडाभर रात्री हे तापमान १८ ते १९ अंशांदरम्यान राहण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण भागात तापमानाचा पारा नेहमीच एक किंवा दोन अंशांनी कमी असतो. त्यामुळे तेथेही पारा जरी १७ ते १९ अंशांदरम्यान राहणार असला, तरी प्रत्यक्षात १६ अंशांइतका गारवा जाणवेल, असाही अंदाज आहे.आंब्याला येणार मोहोर,हरभराही तरारणार!मस्त थंडी पडली, की आंब्याला छान मोहोर येतो आणि स्वाभाविकपणे जोमदार फळे धरतात, असा शेतकºयांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी अवेळी हजेरी लावलेल्या पावसाने मोहोरालाही फटका बसला होता आणि नंतर फळ धरण्याच्या काळात आलल्या पावसाने अंबा गळून पडला होता. यंदा सध्याची परिस्थिती आंब्याला पोषक आहे. त्यामुळे मोहोर चांगला येईल आणि फळधरणीही चांगली होईल, असे मानले जाते. सध्या ठिकठिकाणी हरभ-याची लागवड झाली आहे. थंडी, पहाटे पडणारे दव यामुळे हरभरा तरारून येतो. या खेरीज पालेभाज्या, फुलांच्या लागवडीलाही हे वातावरण पोषक ठरते.पुन्हा धुक्याची दुलई? : थंडी वाढू लागली की पहाटेच्या सुमारास पडणारे धुकेही दाट होत जाते. दोन आठवड्यांपूर्वी थंडीमुळे धुके वाढत गेले. त्यात प्रदूषणाची भर पडली आणि लोकल वाहतूक, रस्त्यावरील-खास करून घाटातील वाहतुकीला त्याचा फटका बसला. पुढच्या आठवड्यातही धुके दाटून आले तर दृश्यमानता कमी होण्याचा धोका आहे.अशी असेल माघाची थंडी...सध्याचे रात्रीचे तापमान - १९ ते २१ अंश सेल्सियसशनिवारपर्यंतचा अंदाज - १८ अंश सेल्सियसचारविवारचे तापमान - १७ अंश सेल्सियसपुढील आठवड्यातील सरासरी - १८ ते १९ अंश सेल्सियस

टॅग्स :thaneठाणे