लोकमत इफेक्ट: मध्यवर्ती रुग्णालयातील स्वयंपाकघराची साफसफाई

By सदानंद नाईक | Published: October 16, 2023 06:47 PM2023-10-16T18:47:49+5:302023-10-16T18:48:36+5:30

रविवारी दुपारी संपूर्ण स्वयंपाकघर धुवून स्वच्छ केले आहे. 

lokmat effect cleaning a central hospital kitchen | लोकमत इफेक्ट: मध्यवर्ती रुग्णालयातील स्वयंपाकघराची साफसफाई

लोकमत इफेक्ट: मध्यवर्ती रुग्णालयातील स्वयंपाकघराची साफसफाई

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात भाजीपाला उघडयावर अशी बातमी रविवारी लोकमत मध्ये प्रसिद्धी होताच, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी याची दखल घेत स्वयंपाक घराची साफसफाईचे आदेश दिले. रविवारी दुपारी संपूर्ण स्वयंपाकघर धुवून स्वच्छ केले आहे. 

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, टोकावडे व ग्रामीण परिसरातील रुग्णांनी एकच गर्दी केली असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी १६०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत आहे. जिल्ह्यात हि संख्या इतर रुग्णालयाच्या तुलनेत सर्वाधिक असून २०० बेडच्या रुग्णालयात सरासरी २६० पेक्षा जास्त रुग्ण दररोज उपचार घेत आहेत. तर ३५ टक्के पेक्षा जास्त डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यावर ताण वाढला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाष्टा दिला जात असून रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात दररोज ५०० पेक्षा जास्त जणांचे जेवन बनविले जाते. मात्र ज्या स्वयंपाकघरात रुग्णांना जेवण बनविले जाते. भाजीसाठी आणलेला भाजीपाला उघडण्यावर ठेवून अस्वछतेचे प्रमाणरुग्णालय स्वयंपाक घरात असल्याची बातमी रविवारी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली होती.

 मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोड यांनी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन, रुग्णालय स्वयंपाकघराच्या साफसफाईचे आदेश दिले. रविवारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण स्वयंपाकघर धुऊन स्वच्छ केले. तसेच जेवण बनविण्याची मोठी भांडी धुतली. भाजीपाला व इतर सामान झाकून ठेवण्याची व्यवस्था केली. रुग्णालय स्वयंपाक घर स्वच्छ होते. मात्र भाजी बनविण्यासाठी आणलेली भाजी उघडयावर ठेवण्यात आली होती. याबाबत स्वयंपाकघर सांभाळणाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या असून यानंतर थेट कारवाई करण्याचे संकेत डॉ बनसोडे यांनी दिले आहे.

Web Title: lokmat effect cleaning a central hospital kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.