शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत गणेश नाईक राष्ट्रवादीचे ‘ठाणे’दार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 02:41 IST

ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाचा खासदार झाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिका निवडणुकीत होईल, असा कयासही लावण्यात आला. त्यानुसार, माजी मंत्री गणेश नाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. तिला माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे उपस्थित होते. या बैठकीत आव्हाडांविरोधात कारस्थान करू पाहणाºयांनी एकदिलाने काम करण्याची हमी दिली. मागील वेळी राष्टÑवादीच्या उमेदवाराचा का पराभव झाला, त्याची कारणे काय होती, आता कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, यावर भर देण्यात आला. त्यानुसार, येत्या काळात बैठकीला उपस्थित असणाºया प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवार कोणीही असो, आम्ही एकदिलाने, जोमाने काम करू आणि मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते; किंबहुना राष्टÑवादीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास प्रत्येकाने दिला.काही महिन्यांपासून आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे असा अंतर्गत कलह निर्माण झाला होता. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत राष्टÑवादीला सहन करावे लागतील, असे चित्र होते. परंतु, या बैठकीत या सर्वांनीच एकतेचा नारा देऊन एकत्रितपणे काम करण्याची हमी दिली.कल्याणामधून जितेंद्र आव्हाडकाही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा आणि जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, असे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या चर्चेत गणेश नाईक यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांना कल्याणमधून लढण्याची गळ घालण्यात आली असली, तरी त्याबाबत आजही संभ्रम कायम आहे.

टॅग्स :thaneठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९