शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे परिस्थिती खालावली; जुगारात मात्र हजारोंच्या उलाढाली, मंडपात रंगले पत्त्यांचे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 00:48 IST

शासकीय निर्देशानुसार भक्तांनी उत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी अनेक प्रकारचे बदल केले आहेत. मूर्तींची उंची कमी केली असून, दर्शन घेण्यासाठी येत असलेल्या भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी स्वयंसेवक काळजी घेत आहेत.

कुमार बडदे मुंब्रा : शासकीय दिशानिर्देशानुसार यावर्षी साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी अनेक बदल केले असले, तरी बहुतांश मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा तो कोपरा मात्र तसाच ठेवला असून, तेथे गणेश चतुर्थीपासून पत्त्यांचे डाव रंगत आहेत. या डावांमध्ये दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाखो जणांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली असल्याची ओरड सुरू असतानाच गणेशोत्सवादरम्यान सुरू असलेल्या जुगारामध्ये मात्र दररोज हजारो रुपयांची देवाणघेवाण होत असल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

राज्यातील बहुतांश नागरिक ज्या उत्सवाची वर्षभर आतुरतेने प्रतीक्षा करतात, तो गणेशोत्सव सध्या राज्यात उत्साहात सुरू आहे.कोरोनामुळे शासनाने उत्सवाबाबत विविध प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचा तसूभरही परिणाम बाप्पाच्या भक्तांवर झाला नसून सरकारने आखून दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून उत्सव उत्साहात सुरू आहे.

शासकीय निर्देशानुसार भक्तांनी उत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी अनेक प्रकारचे बदल केले आहेत. मूर्तींची उंची कमी केली असून, दर्शन घेण्यासाठी येत असलेल्या भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी स्वयंसेवक काळजी घेत आहेत.मंडपांचा व्यासदेखील कमी केला असला, तरी अनेकांनी प्रतिवर्षाप्रमाणे डाव खेळण्यासाठी ठेवण्यात येणारा एक कोपरा मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. त्या ठिकाणी सध्या रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रमी, तीनपत्त्यांचे डाव रंगत आहेत.ते फक्त मनोरंजनासाठी खेळले जात असल्याचे कार्यकर्ते पोटतिडकीने सांगत असले, तरी बहुतांश ठिकाणी खेळादरम्यान पैशांचा व्यवहार होत असून खेळामध्ये रंक होणारा दुसºया दिवशी साव होण्यासाठी पुन्हा खेळण्यासाठी पुन्हा येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव